Sushmita Sen Lalit Modi dating : मी वाद निर्माण करतो पण..., ललित मोदींची नवी पोस्ट, ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:11 AM2022-07-26T10:11:27+5:302022-07-26T10:14:53+5:30

Sushmita Sen Lalit Modi dating : ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या अफेअरवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. या सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Lalit Modi shared a post ahead of relation with Sushmita Sen | Sushmita Sen Lalit Modi dating : मी वाद निर्माण करतो पण..., ललित मोदींची नवी पोस्ट, ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Sushmita Sen Lalit Modi dating : मी वाद निर्माण करतो पण..., ललित मोदींची नवी पोस्ट, ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

googlenewsNext

Sushmita Sen Lalit Modi dating : आयपीएलचे माजी चेअरमॅन ललित मोदी (Lalit Modi) आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचे  (Sushmita Sen) रोमॅन्टिक फोटो व्हायरल झालेत आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. मी व सुष्मिता एकमेकांना डेट करत असल्याचं ललित मोदींनी जाहिर केल्यावर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मग काय सगळीकडे याच डेटींगची चर्चा सुरू झाली. एक ना अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यादरम्यान सुष्मिता व ललित मोदी जबरदस्त ट्रोलही झालेत. या ट्रोलिंगवर ललित मोदींनी आधीच आपली प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा ते या ट्रोलिंगवर व्यक्त झाले आहेत.

ट्रोलर्ससाठी ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.  काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ललित मोदींनी एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये चार वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या आहेत. या चार बातम्यांपैकी एक बातमी ललित आणि सुष्मिताच्या नात्याची आहे. लोक देशाच्या मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र प्रत्येकाला ललित मोदी व सुष्मिताच्या नात्याच्या बातम्यांमध्ये अधिक रस आहे, हे या व्यंगचित्रात दाखवलं गेलं आहे.  
 या पोस्टला ललित मोदींनी दिलेलं कॅप्शनही भन्नाट आहे. ‘मी वाद निर्माण करतो, मात्र अशाप्रकारे...,’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ललित मोदींच्या या पोस्टवर नेहमीप्रमाणे लोकांनीही एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘भाई, उसने अभी आपको टॅग नहीं किया बायो में’, अशी कमेंट एकाने केली आहे. ‘मोदी है तो मुमकिन है,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘बडा हो जा भाई,’असं एकाने लिहिलं आहे.
 गेल्या 14 जुलै रोजी ललित मोदी यांनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे सुष्मिता सेनसोबतचं नातं जगजाहीर केलं होतं. एका ट्विटमध्ये त्यांनी सुष्मिताला ‘बेटर हाफ’ म्हटलं होतं. त्यामुळे  त्यांनी लग्न केलं, असा अर्थ लोकांनी काढला होता.  मात्र, नंतर लगेच अन्य एका पोस्टमध्ये मोदींनी आम्ही दोघं सध्या एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं.  

Web Title: Lalit Modi shared a post ahead of relation with Sushmita Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.