"मला नेहमीच कमी लेखलं गेलं", बॉलिवूडबद्दल प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 01:28 PM2024-02-28T13:28:58+5:302024-02-28T13:30:30+5:30
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व भाजपा खासदार अभिनेते रवी किशन सध्या त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या मुव्हीमुळे चर्चेत आहेत.
Ravi Kishan : अभिनेते रवी किशन अभिनय आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. संसदेतील भाषण असो किंवा रुपेरी पडद्यावरील अभिनय असो त्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. ‘तेरे नाम, ‘लक’, ‘मुक्काबाज’, ‘लखनौ सेंट्रल’ ‘मिशन रानीगंज’सारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात रवी किशन झळकले आहेत.
सध्या रवी शंकर त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आलेत. नुकतंच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील पडद्यामागील वास्तव्यावर भाष्य केलं आहे.
"हिंदी सिनेसृष्टीत माझ्या कामाची कधीच दखल घेतली गेली नाही. मला नेहमी कमी लेखलं गेलं," असं ते म्हणाले. पुढे त्यांनी लापता लेडीजमधील भूमिकेसाठी किरण रावचे आभार मानले. "पण, मी किरण राव यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी मोठ्या विश्वासाने मनोहर सारख्या उत्तम भूमिकेसाठी माझी निवड केली", असंही ते म्हणाले.
अभिनेता अमिर खानची पत्नी किरण राव दिग्ददर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रवी किशन मनोहर या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. येत्या १ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.