अखेर एकदाचा ‘संघर्ष’ संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 02:40 AM2016-02-12T02:40:45+5:302016-02-12T02:40:45+5:30
गेले काही महिने येणार येणार म्हणून चर्चेत असलेला; परंतु अद्याप पडद्यावर न येऊ शकलेल्या 'संघर्षयात्रा' या चित्रपटाचा संघर्ष एकदाचा संपला आहे. १९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट अखेर
गेले काही महिने येणार येणार म्हणून चर्चेत असलेला; परंतु अद्याप पडद्यावर न येऊ शकलेल्या 'संघर्षयात्रा' या चित्रपटाचा संघर्ष एकदाचा संपला आहे. १९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट अखेर पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. दिवंगत ज्येष्ठ राजकीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट असल्याने त्याविषयी खूप उत्सुकता होती. पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या काही अडचणींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबत चालले होते. अखेर या सर्व अडचणींवर मात करण्यात या चित्रपटाच्या टीमला यश आले आहे. याविषयी बोलताना या चित्रपटाचा दिग्दर्शक साकार राऊत म्हणतो, कुठलीही गोष्ट होते ती चांगल्यासाठीच होत असते. आम्ही या चित्रपटातून १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे आणि दरम्यानच्या काळात काही नवीन प्रसंगांची भरही आम्ही या चित्रपटात घातली आहे. या चित्रपटात गोपीनाथ मुंडे यांची व्यक्तिरेखा अभिनेता शरद केळकर याने रंगवली आहे. शरदचा लूक गोपीनाथ मुंडे यांच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळून यावा म्हणून शरदला प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला आहे आणि ही महत्त्वाची जबाबदारी रंगभूषाकार प्रदीप प्रेमगिरीकर यांनी सांभाळली आहे. शरद तर या भूमिकेबाबत प्रचंड एक्साइट आहे. मला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आल्यावर मी जवळजवळ महिनाभर टाळाटाळ केली होती; परंतु साकार राऊत काही मला सोडायला तयार नव्हता. मी मुंडे साहेबांसारखा दिसेन, असा त्याला आत्मविश्वास होता. मी पहिल्यांदा मेकअपला बसलो आणि प्रदीप प्रेमगिरीकर यांनी जेव्हा माझा मेकअप रेडी केला, तेव्हा मला साकारचे म्हणणे खऱ्या अर्थाने पटले, असे शरद त्याच्या या भूमिकेविषयी म्हणतो.
- raj.chinchankar@lokmat.com