आता आमिर खान आणि लता मंगेशकर सरसावले महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 01:54 PM2019-08-21T13:54:36+5:302019-08-21T13:57:36+5:30
Maharashtra Flood Updates: आता बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावली आहेत.
सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे.
Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
@Riteishd@geneliadpic.twitter.com/Y6iDng2epD
आता बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी पुरग्रस्तांसाठी 25 लाखाची मदत केली. त्यानंतर बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनी 51 लाखांची मदत केली. आता लता मंगेशकर आणि आमिर खान यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत रक्कम जमा केली आहे. लता मंगेशकर यांनी 11 लाखांची तर आमिरने 25 लाखांची मदत केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्यां दोघांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आदरणीय लतादीदी मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे!
We are also thankful to Respected Lata Didi for the contribution of ₹11,00,000/- (₹11 lakh) towards #CMReliefFund#MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2019
आदरणीय लतादीदी मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे!@mangeshkarlata
तसेच आमिर खानचे आभार मानत त्यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांचे योगदान दिल्याबद्दल आमिर खान यांचे धन्यवाद...
Thank you @aamir_khan for your contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund#MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2019