Lata Mangeshkar: लता दीदींचा हा फोटो पाहून लोक होताहेत भावूक, तुमचेही डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:15 PM2022-02-14T17:15:51+5:302022-02-14T17:16:25+5:30
प्रसिद्ध गायक अदनान सामी याने लता दीदींचा हा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आज आपल्यात नसतील, पण त्यांचा आवाज कायम राहणार आहे. लता दीदींच्या निधनानंतरही त्यांचे चाहते त्यांना विसरू शकत नाहीत आणि त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या आठवणी कायम ठेवत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी यानेही लता दीदींची अनोख्या पद्धतीने आठवण काढली.
अदनान सामी याने लता दीदींची अनोख्या पद्धतीने आठवण काढली आहे. अदनानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पेंटिंग शेअर केली आहे, ज्यामध्ये लता मंगेशकर दिसत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त या पेटींगमध्ये किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, नौशाद साहेब, मदन मोहन, एसडी बर्मन आणि पंचम दा दिसत आहेत. या पेटींगला स्वर्गाचे स्वरुन देण्यात आले असून, लता दीदी स्वर्गात जाताना दिसत आहेत आणि हे सर्व दिग्गज दीदींचे स्वागत करत आहेत.
Love this…🙏#RIPLatajipic.twitter.com/cBFlgZerfB
— Adnan Sami (@AdnanSamiLive) February 14, 2022
अदनानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही एक पेंटिंग शेअर केली आहे. या पेंटिंगमध्ये सर्व दिग्गज लतादीदींचे स्वागत करताना दिसत आहेत. अदनानने शेअर केलेले हे पेंटिंग पाहून सोशल मीडियावर लोक खूप भावूक होत असून, विविध कमेंटमधून दीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
लता दीदींचे 6 फेब्रुवारी रोजी निधन
6 फेब्रुवारी रोजी सकाळी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता दीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.