अभिनेत्यांनाही खुणावतेय नेत्यांची ‘खुर्ची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 12:05 AM2017-01-30T00:05:23+5:302017-01-30T05:00:21+5:30

राजकारण आणि अभिनय या तशा दोन ध्रुवावरच्या दोन गोष्टी. अनेक अभिनेते नेत्यांची भूमिका साकारतात खरे परंतु ती त्यांची व्यावसायिक गरज असते.

Leaders of 'Leaders' | अभिनेत्यांनाही खुणावतेय नेत्यांची ‘खुर्ची’

अभिनेत्यांनाही खुणावतेय नेत्यांची ‘खुर्ची’

googlenewsNext

tyle="text-align: justify;">- विरेंद्र जोगी 
राजकारण आणि अभिनय या तशा दोन धु्रवावरच्या दोन गोष्टी. अनेक अभिनेते नेत्यांची भूमिका साकारतात खरे परंतु ती त्यांची व्यावसायिक गरज असते. ऐरवी कुणी ग्लॅमरचा हा झगमगाट सोडून राजकारणाच्या दलदलीत जाऊ इच्छित नाही. परंतु राजकारणही आता ग्लॅमराईज झाल्याने व कमी वेळात बक्कळ पैसा या क्षेत्रातही कमवता येत असल्याने बॉलिवूडमधील अनेक कलावंतांना राजकारणाचे क्षेत्र खुणावू लागले आहे. यात ‘बी ग्रेड’ कलावंतांसोबतच चक्क अक्षय कुमार, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या मोठया अभिनेत्यांचीही नावे पुढे यायला लागली आहेत. तसेही दक्षिणेतील एमजीआर, जयललिता, एनटीआर यांनी तर थेट राज्याचे मुख्यमंत्री पदही सांभाळले आहे. त्यांच्याच मार्गावर पुढे निघालेल्या कलावंत नेत्यांवर एक नजर...

सनी लिओन :
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सनी लिओनच्या एका फोटोची चांगलीच धूम होती. या फोटोवर चक्क सनी लिओन उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथून आमदारकीची उमेदवार असून तिला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हा फोटो फोटोशॉपवर एडिट करून पोस्ट करण्यात आला होता. अनेकांनी या फोटोवर सनी लिओनने निवडणूक लढविली तर आम्ही तिला मते देऊ असे मत व्यक्त केले आहे. सोबतच आम्ही सनीचा प्रचार करू अशीही तयारी दर्शविली आहे. अभिनेते नेत्यांच्या प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहचतात हे आपण पाहत आलो आहोत. मात्र सनी लिओन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास आम्हीच तिचा प्रचार करू असे मत मुरादाबाद येथील मतदारांनी नोंदविले होते.

अर्जुन रामपाल
बॉलिवूडचा ‘हँडसम हिरो’ अर्जुन रामपाल याने उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्याने जॅकी श्रॉफला सोबत घेतले आहे. नुकतेच अर्जुन रामपालने भाजपा कार्यालयाला भेट दिली. भाजपा महासचिव कैलाश विजयवर्गिय यांना भेटून आपण पाच राज्यात होणाऱ्या निवडणूकीचा प्रचार करणार आहोत असे सांगितले. अर्जुन रामपाल याने आपण पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करीत त्यांच्या कामामुळे प्रभावित झालो असल्याचे सांगितले आहे.

राज बब्बर
भारदस्त आवाज व जिवंत अभिनय अशी ओळख असणाऱ्या राज बब्बर यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत राजकारणांत सक्रिय झाले आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज बब्बर यांच्या खांद्यावर आहे. उत्तर प्रदेशातील वर्तमान सत्ताधारी पक्षासोबत काँग्रेसची आघाडी करण्यात राज बब्बर यांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे. राज्यात काँग्रेसला यश मिळाल्यास याचे श्रेय राज बब्बर यांना देखील मिळते. राज बब्बर यांनी अमित शहा यांच्यावर केलेला शाब्दिक हल्ला चांगलाच चर्चेत आला आहे. राज बब्बर आता मातब्बर राजकारणी झाले आहेत.

राजपाल यादव
उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहत असताना कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजपाल यादवने सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. त्याने लखनौ येथे ‘सर्व समभाव पार्टी’(एसएसपी) हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. मला राजकाराणात येऊन लोकांची सेवा करायची आहे. आमचा पक्ष निवडणूक लढविणारच आहे. पण आमची निवडणुकीची रणनीती वेगळी असेल. राजकारण कसे केले जाते ते आम्ही समाजाला व अन्य राजकारण्यांना शिकविणार आहोत, असे मत राजपाल यादवने सांगितले आहे.

अक्षय कुमार
२०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अक्षय कुमार भाजपाचा उमेदवार असेल असे सांगण्यात येत आहे. यासाठी आतापासून अक्षयने तयारी चालविली असून भाजपाशी जवळीक निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान त्याने नुकतीच गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन सैनिकांसाठी अ‍ॅप आणण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कात आल्यावर त्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाचे पालकत्व स्वीकारले होते. सध्या अक्षय कुमारची भाजपाशी असलेली जवळीक चांगलीच चर्चेत आहे. असेही सांगण्यात येते की, तो शत्रुघ्न सिन्हाची जागा घेऊ शकतो.

रिमी सेन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे प्रभावित झालेल्या रिमी सेन हिने उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोडांवर भाजपात प्रवेश केला. रिमी सेन उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबमधील आगामी निवडणुकीत प्रचार करणार आहे. प्रियदर्शन यांच्या ‘हंगामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या रिमी सेन हिने अनेक बड्या कलावंतासोबत काम केले मात्र तिचे बॉलिवूड करिअर फार छोटे ठरले. निवडणूकीच्या काळात रिमी सेनने केलेला भाजपा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Leaders of 'Leaders'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.