टीकाही पचवायला शिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2016 11:33 AM2016-05-30T11:33:38+5:302016-05-30T17:03:38+5:30

सोशल मीडियामुळे सेलिब्रेटींशी थेट संवाद साधण्याची लोकांना संधी मिळत आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कलाकारांच्या कामाचे जितके कौतुक केले जाते, ...

Learn to digest criticism | टीकाही पचवायला शिका

टीकाही पचवायला शिका

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सोशल मीडियामुळे सेलिब्रेटींशी थेट संवाद साधण्याची लोकांना संधी मिळत आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कलाकारांच्या कामाचे जितके कौतुक केले जाते, तितकीच त्यांच्यावर टीकाही केली जाते. त्यांच्या कामावर, त्यांच्या वैयक्तिक जीवनावर सगळ्यावरच फॅन्स सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून टीका करत असतात. 
गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब हे सोशल नेटवर्किंगवर लोकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. ऐश्वर्याने कान फिल्म फेस्टिव्हलला काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी तिने लावलेल्या पर्पल रंगाच्या लिपस्टिकवरून तिच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती. अनेक दिवस तिच्या लिपस्टिकच्या रंगाची चर्चा सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली होती. त्यानंतर काहीच दिवसांत सरबजित या चित्रपटाच्या प्रिमियरच्यावेळी फोटोग्राफर्सने थांबवले असताही अभिषेक ऐश्वर्यासोबत फोटो न काढता पुढे निघून गेला.अभिषेकला काय झाले हे काही क्षणासाठी ऐश्वर्यालादेखील कळले नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच गाजला होता. या व्हिडिओनंतर ऐश-अभिषेकमध्ये काही बिनसलंय का अशीही उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची नात नव्या नंदाने ग्रॅज्युएशनच्या आनंदात मोठे सेलिब्रेशन केले होते, याचे फोटो तिने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले होते. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या सगळ्या गोष्टींमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून बच्चन कुटुंब सोशल नेटवर्किंगमध्ये चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्यावर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून टीकाही केली जात आहे. पण या टीकांच्या बाबतीत अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मत खूपच वेगळे आहे. 
अमिताभ यांच्यामते सोशल नेटवर्किंगवर प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.ट्विटर तर एक खूपच चांगले माध्यम असल्याचे त्यांना वाटते. ते सांगतात, ट्विटरवरचे अनेक ट्वीट खूप चांगले असतात. अनेकवेळा आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळते. आपण या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहाण्याची गरज आहे. सोशल नेटवर्किंगमुळे लोकांना आपली मते, आपले विचार मांडता येत आहेत. सोशल मीडियावर ज्यावेळी आपण व्यक्त होत असतो, त्यावेळी दुसऱ्याने आपल्यावर काही टीका केली तर तीदेखील आपण सहन केलीच पाहिजे. मत व्यक्त करणे हे आपल्या देशात खूप कठीण आहे. पण आपण त्या गोष्टीचा आदर केलाच पाहिजे. कलाकार ज्यावेळी एखादे चांगले काम करतो. त्यावेळी फॅन्स त्याचे कौतुक करतात, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात. पण तुमचे कौतुक करण्यासोबतच तुमच्यावर टीका करण्याचाही तुमच्या फॅन्सना अधिकार आहे. केवळ तुमच्या फॅन्सनी तुमच्यावर केलेली टीका पचवण्याची ताकद तुमच्यात असणे अतिशय गरजेचे आहे. आणि तुमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्याला योग्यरितीने उत्तरे देणे हा मार्ग अवलंबवला जाऊ शकतो. पण तुमच्यावर कोणी टीका करत आहे. त्यामुळे त्या व्यक्तिला ब्लॉक करणे हे अतिशय चुकीचे आहे. 
सोशल नेटवर्किंगवर वाद होऊन लोकांना ब्लॉक करण्याचे प्रकारे अनेक सेलिब्रेटी करत असतात. पण ब्लॉक करणे हा त्यावर उपाय नाही ही गोष्ट इतर सेलिब्रेटींनी अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.

Web Title: Learn to digest criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.