जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राने आव्हानात्मक परिस्थितीतही कसे केले 'शेरशाह' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 01:09 PM2021-08-07T13:09:50+5:302021-08-07T13:10:39+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी शेरशाह या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे, हा चित्रपट कारगिल नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनावर आधारित आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी शेरशाह या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे, हा चित्रपट कारगिल नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही सीन्स कारगिलमध्ये शूट करण्यात आले होते. तीव्र आक्रमक दृश्यांचे बहुतेक चित्रीकरण तेथेच केले गेले आहे. आणि तिथल्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, अत्यंत अटीतटीच्या परिस्थितीतही मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीक्वेन्ससह चित्रपटाचे चित्रीकरण करणे खूप कठीण होते पण टीमने सर्व आव्हानांचा सामना केला आणि शूट पूर्ण केले.
चित्रपट शक्य तितका रिअल आणि ऑर्थेंटिक ठेवत, या चित्रपटाचा मुख्य भाग कारगिलमध्ये सुमारे १४००० फूट उंचीवर चित्रीत करण्यात आला आहे . या सर्व अॅक्शन सीक्वन्सला न्याय देण्यासाठी, सिद्धार्थने निश्चय केला की तो तो सर्व हाताने लढण्याचे जड सीन आणि शस्त्रांचे सीक्वेन्स स्वतः करेल. या ठिकाणच्या उंचीमुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सेटवरील कोणत्याही दुखापतीतून सावरणे खूप कठीण होते, परंतु सिद्धार्थने आव्हानात्मक वातावरणातही पूर्ण समर्पणाने सर्व स्टंट अॅक्शन सीक्वेन्स असे पुर्ण केले जसे की त्याने स्वतःला पूर्णपणे या भूमिकेसाठी समर्पित केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सिद्धार्थची मेहनत दिसून येते, यावरून हे दिसून येते की पूर्ण टीमने स्क्रीनवर काही वास्तववादी अँक्शन सीक्वेन्स निश्चितपणे पडद्यावर उतरविण्यात यश मिळवले आहे.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर लाँच कारगिल दिनानिमित्त करण्यात आला आणि विशेष गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन कारगिलमध्येच करण्यात आले होते.
बॉलिवूडच्या अनेक तारकांनी ट्रेलर आणि सिद्धार्थचे जोरदार कौतुक केले आहे. अक्षय कुमार, आलिया भट्ट, करीना कपूर वरुण धवन, अनन्या पांडे, सारा अली खान आणि विकी कौशल आणि इतर अनेक अभिनेत्यांनी आपापल्या सोशल मीडियावर जाऊन आपला उत्साह शेअर केला आणि टीमला शुभेच्छा दिल्या. चित्रपटाची गाणीही लोकांना आवडत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या जोडीचेही खूप कौतुक होत आहे. सिद्धार्थच्या महिला चाहत्यांची संख्येच्या विचार करता हा आकडा बराच मोठा आढळून येतो आणि या चित्रपटामुळे यात अजून भर पडू शकते कारण प्रेक्षकांकडून सिद्धार्थबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या वर्षीचा स्वातंत्र्य दिन शौर्य, प्रेम आणि त्यागाची अविश्वसनीय कथेचा साक्षीदार असेल. विष्णु वर्धन दिग्दर्शित, धर्मा प्रोडक्शन आणि काश एण्टरटेन्मेंट संयुक्तपणे निर्मित, शेरशाह कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) च्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि धर्मा प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने अमेझॉन ओरिजिनल मूव्ही 'शेरशाह'चा प्रीमियर १२ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.