गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:18 PM2024-10-02T16:18:44+5:302024-10-02T16:19:20+5:30
गोविंदाप्रमाणेच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. या घटनेनंतर त्या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया.
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर गोविंदाला लगेचच अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंदाप्रमाणेच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. या घटनेनंतर त्या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया.
अभिनयाबरोबरच सौंदर्याने अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. लीना यांनी १९७५ साली सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केलं होतं. सिद्धार्थ हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे पुत्र होते. पण, लग्नाच्या ११ दिवसांनीच त्यांच्याबरोबर एक अघटित घटना घडली. रिव्हॉल्वर साफ करत असताना चुकून त्यांना त्यांच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, ११ महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लीना चंदावरकरांना मोठा धक्का बसला होता. अवघ्या २६व्या वर्षी लीना चंदावरकर विधवा झाल्या होत्या.
पतीच्या निधनानंतर लीना या नैराश्यात गेल्या होत्या. पतीच्या मृत्यूसाठी लोकांनी त्यांना दोष देण्यास सुरुवात केली होती. पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सिनेमांच्या कामासाठी त्यांनी मुंबई गाठली. 'प्यार अजनबी है' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान लीना आणि किशोर कुमार यांचे सूर जुळले. १९८० मध्ये किशोर कुमार आणि लीना यांनी लग्नगाठ बांधली. लीना या किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी होत्या. किशोर कुमार यांच्याशी लग्न करताना त्या गरोदर होत्या.