बॉलिवूडचे असे 5 सिनेमे ज्यांच्या शूटिंगआधी बदलली गेली पूर्ण स्टारकास्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:28 PM2018-06-20T12:28:46+5:302018-06-20T12:29:45+5:30
वेळेवर स्टारकास्ट बदललेल्या सिनेमांबद्दल आपण जाणून घेऊया. या सिनेमाची शूटिंग सुरु होताच या सिनेमाची पूर्ण कास्ट बदलण्यात आली होती.
बॉलिवूडमध्ये कुणी एका रात्रीत स्टार होतं तर कुणी एका रात्रीत फ्लॉप होतं. बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे खरंतर कुणीही सांगू शकत नाही. इथे वेळेवर कधी काय बदलेल याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. अशाच वेळेवर स्टारकास्ट बदललेल्या सिनेमांबद्दल आपण जाणून घेऊया. या सिनेमाची शूटिंग सुरु होताच या सिनेमाची पूर्ण कास्ट बदलण्यात आली होती.
1) दिल चाहता हैं
दिग्दर्शक फरहान अख्तरचा सुपरहिट सिनेमा 'दिल चाहता है' ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. बॉलिवूडच्या सर्वात चांगल्या सिनेमांमध्ये 'दिल चाहता है' चा समावेश केला जातो. पण हे फारच कमी लोकांना माहीत असेल की, जेव्हा दिल चाहता है चं प्लॅनिंग सुरु झालं तेव्हा या सिनेमात अभिषेक बच्चन, हृतिक रोशन आणि अक्षय खन्ना हे कलाकार होते. पण काही कारणांमुळे अभिषेक आणि हृतिक हे हा सिनेमा करु शकले नाही. आणि वेळेवर आमिर आणि सैफची एन्ट्री झाली.
2) बाजीराव मस्तानी
रणवीर सिंगच्या करिअरला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या 'बाजीराव मस्तानी'साठी आधी सलमान खान आणि अजय देवगण यांची चर्चा होती. पण काही कारणांनी या कलाकारांनी संजय लीला भन्साली याला सिनेमा करण्यास नकार दिला.
3) रॉ
जेव्हा 'रॉ' या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा त्या सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा चेहरा होता. पण शूटिंगला उशीर होत असल्याने त्याने हा सिनेमा करण्यास नकार दिला. त्यांनतर या सिनेमाच जॉन अब्राहमची एन्ट्री झाली. लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे.
4) सल्यूट
'सल्यूट' या सिनेमाची घोषणा करण्यात आली तेव्हा या सिनेमात आमिर खान आणि प्रियंका चोप्रा होते. पण पुढे काही कारणांमुळे त्यांनी सिनेमा करण्यास नकार दिला. आता या सिनेमात शाहरुख खान आणि करिना कपूर दिसणार आहे.
5) दस
दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्या 'दस' सिनेमासाठी त्यांनी संजय दत्त आणि सलमान खान यांना साइन केलं होतं. पण या सिनेमाचं अर्ध शूटिंग झालं तेव्हा मुकुल आनंद यांचा मृत्यू झाला. पुढे हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. पण पुढे काही वर्षांनी 'दस' नावाचा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात संजय दत्तसोबतच सुनील शेट्टी, अभिषेक आणि झायेद खान दिसले.