कार अपघातातून थोडक्यात बचावली "धाकड गर्ल"
By Admin | Published: June 10, 2017 05:03 PM2017-06-10T17:03:33+5:302017-06-10T17:30:24+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या ""दंगल"" सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली बालकलाकर ""झायरा वसीम"" कार अपघातातून थोडक्यात बचावली आहे.
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 10 - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या "दंगल" सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम अपघातातून थोडक्यात बचावली आहे. श्रीनगरमधील ही घटना आहे. शुक्रवारी रात्री झायरा आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेली असताना तिच्या कारला अपघात झाला.
बुलेवार्ड रोडवर तिच्या कारला अपघात झाला. भरधाव वेगात असणा-या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर गाडी फूटपाथवर चढली व रेलिंगला धडकली व नंतर कार दाल सरोवरात कोसळली. सुदैवानं या अपघातातून झायरा सुखरुप बचावली आहे.
स्थानिकांनी तातडीनं झायरा व तिच्या मित्रांना मदत करुन त्यांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवानं झायराला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही. सोबत असलेला तिचा मित्र आरिफला किरकोळ दुखापत झाली, मात्र आता त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
वादात अडकली होती झायरा वसीम
झायराला दंगल सिनेमासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. दरम्यान या वर्षी सुरुवातीला झायरा वसीमनं जम्मू काश्मीरच्या मुख्यमत्री महबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यामुळे चौफेर टीका झाली होती. काश्मीरमधील पीडितांना भेटायचे सोडून काश्मीरमधल्या त्रासाला जबाबदार असलेल्यांना म्हणजे मुफ्तींना ती का भेटली? असा टीकेचा रोख होता.
16 वर्षीय झायरा सोशल मीडियावरील अपशब्दांमुळे इतकी त्रासली होती की तिनं सरळ आपला माफीनामा पोस्ट केला. मात्र अवघ्या काही वेळातच तिने हा माफीनामा सोशल मीडियावरून हटवला. यानंतर तिला समर्थन दर्शवण्यासाठी दिग्गजांनीही या वादात उडी घेतली.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला, जावेद अख्तर, अभिनेता अनुपम खेर, स्वरा भास्कर या बॉलिवूड सेलिब्रिटींसह कुस्तीपरटू गीता फोगटनंही तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केले. #ZairaWasim या हॅशटॅगसह अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट करू लागले होते.
Srinagar: Actor Zaira Wasim had a narrow escape after her car skidded off the road and fell into the Dal Lake on June 8th. pic.twitter.com/7U2gUviXvA— ANI (@ANI_news) June 10, 2017