लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकले बॉलिवूडचे ‘हे’ दोन कलाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 06:34 PM2020-04-12T18:34:01+5:302020-04-12T18:36:35+5:30

१४ एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. परिणामी या अडकलेल्या व्यक्तींना त्याठिकाणीच राहण्याशिवाय काही पर्याय देखील नाही. यातूून बॉॅलिवूड सेलिब्रिटीही सुटले नाहीत.

Lockdown: Bollywood's 'Hey' trapped in Uttarakhand! | लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकले बॉलिवूडचे ‘हे’ दोन कलाकार!

लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकले बॉलिवूडचे ‘हे’ दोन कलाकार!

googlenewsNext

देशातही कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सगळी जनता २४ तास घरातच आहे. लॉकडाऊनमुळे कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाहीये. त्याचबरोबर शासनाकडून सर्व ट्रेन, गाड्या त्याचप्रमाणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी आपल्या शहरातून देशातील विविध भागात गेलीली माणसं तिथेच अडकली आहे. १४ एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. परिणामी या अडकलेल्या व्यक्तींना त्याठिकाणीच राहण्याशिवाय काही पर्याय देखील नाही. यातूून बॉॅलिवूड सेलिब्रिटीही सुटले नाहीत.

अशाच परिस्थितीत बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध अभिनेते देखील अडकले आहेत. अभिनेता मनोज वाजपेयी आणि दीपक डोबरियाल या दोघांचे उत्तराखंडमध्ये एकाठिकाणी शूटिंग सुरू होते. मात्र शूटिंग सुरू होताच काही दिवसात कोरोना भारतात पोहोचला आणि बघता बघता लॉकडाऊनची घोषणा देखील झाली. मनोज, दीपक आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडे आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. परिणामी गेल्या ३  आठवड्यांपासून ते सर्वजण त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचेही सुत्रांकडून कळतेय.

दरम्यान मनोज वाजपेयी यांचे कुटुंबीय म्हणजेच त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांच्याबरोबरच उत्तराखंडमध्ये आहेत. मात्र दीपक डोबरियाल यांची पत्नी आणि मुलं मुंबईत आहेत. त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग देखील थांबल्यामुळे सर्व क्रू मेंबर्सना तिथेच अडकून राहावं लागलं आहे.
 

Web Title: Lockdown: Bollywood's 'Hey' trapped in Uttarakhand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.