Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:48 PM2019-05-23T12:48:36+5:302019-05-23T13:04:29+5:30

लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे.

Lok Sabha Election 2019 Result: Swara Bhaskar trolled | Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर

Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वराने बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार आणि दिल्लीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात  भाग घेतला होता.

लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे. सोशल मीडियावर स्वराची खिल्ली उडवणा-या अनेक tweetsचा पूर आला आहे.
देशात पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे चित्र सुरूवातीच्या निकालातून स्पष्ट होताच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी स्वराला लक्ष्य केले आहे. स्वरा ही कट्टर मोदी विरोधक मानली जाते. त्यामुळेच सोशल मीडियावर स्वराला लक्ष्य करणा-या tweetsचा जणू पूर आला आहे.








कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजर ‘अनारकली ऊर्फ स्वरा भास्कर उठो, ईव्हीएम पे रोने का वक्त आ गया है,’असे लिहिले आहे. अनेक युजर्सनी स्वराला डिवचत,कहा हो, असा प्रश्न केला आहे. क्या स्वरा भास्कर ये सब झेल पायेगी, असे ट्विट एका युजरने केले आहे.
 लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वराने बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार आणि दिल्लीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात  भाग घेतला होता. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणा-या स्वराने निवडणूक प्रचारादरम्यानही बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आपले राजकीय विचार मांडले होते. एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्वराने ईव्हीएमच्या वादात उडी घेतली होती. स्वरा भास्करने ट्विट करून इव्हीएममधील गोंधळावर आपले मत मांडले होती. इव्हीएममध्ये आफरातफर झाली असेल किंवा ते बदलण्यात आल्याचे वृत्त खरे असेल तर विरोधी पक्ष न्यायालयात का जात नाही, असा सवाल स्वराने उपस्थित केला होता. तसेच न्यायालयात जाण्याव्यतिरिक्त आणखी काही करता येईल का याची मीमांसा विरोधकांनी करावी, असा सल्ला देखील स्वराने दिला होता.









 

Web Title: Lok Sabha Election 2019 Result: Swara Bhaskar trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.