Lokmat's Most Stylish Award 2018: स्टायलिश जान्हवी कपूरचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:21 IST2018-12-19T23:34:50+5:302018-12-20T00:21:03+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व

Lokmat's Most Stylish Award 2018: स्टायलिश जान्हवी कपूरचा सन्मान
मुंबई: आपल्या अभिनयासोबतच स्टाईलिश लूकमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरला मोस्ट स्टायलिश पदार्पणासाठी गौरवण्यात आलं. जान्हवीनं धडक सिनेमातून पदार्पण करत आपल्या अभिनयानं छाप पाडली. मुंबईत होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात या दोघींना सन्मानित करण्यात आलं.
धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये 'धडक' देणाऱ्या जान्हवी कपूरला मोस्ट स्टायलिश पदार्पणासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. जान्हवीनं तिच्या पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयानं वेगळी निर्माण केली. या सिनेमातील जान्हवीच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली. याशिवाय आपल्या स्टायलिश लूकमुळेदेखील जान्हवी चर्चेत असते. त्यामुळेच लोकमतनं यंदाच्या मोस्ट स्टायलिश पदार्पण पुरस्कारासाठी तिची निवड केली.