Lokmat Most Stylish Award 2018: कार्तिक आर्यन मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:01 AM2018-12-20T01:01:38+5:302018-12-20T01:03:04+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व
मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन लोकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन पुरस्काराचे मानकरी ठरला आहे. मोठमोठे दिग्गज कलाकार बॉलीवूड गाजवत असताना कार्तिक आर्यननं त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला. त्यामुळेच लोकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. मुंबईत होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला सन्मानित करण्यात आलं.
कार्तिक आर्यन म्हणताच अनेकांना प्यार का पंचनामा सिनेमातला 5 मिनिटांचा लांबलचक डायलॉग आठवतो. याच डायलॉगनं कार्तिकच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठी भर घातली. प्यार का पंचनामामधून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणाऱ्या कार्तिकनं त्यानंतर अनेक भूमिका उत्तमपणे साकारल्या. तरुणाई, प्रेम संबंध, त्यातील अडचणी अशा लव्ह लग्न लोचा प्रकारातील सिनेमांमध्ये आपल्या अभिनयानं ठसा उमटला. याशिवाय त्याची तरुणाईला कनेक्ट करणारी लाईफ स्टाईल कायमच चर्चेत राहिली. त्यामुळेच लोकमतनं मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन पुरस्कारानं त्याचा गौरव केला आहे.