Lokmat's Most Stylish Award 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:19 IST2018-12-20T00:18:45+5:302018-12-20T00:19:53+5:30
रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही रणवीरनं आपलं वेगळं स्टाईल स्टेटमेंट तयार केलंय

Lokmat's Most Stylish Award 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार
मुंबई: आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंग लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. रणवीर त्याच्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटसाठीही कायम चर्चेत असतो. त्याचा स्टायलिश लूक इंडस्ट्रीत अनेकदा ट्रेंडसेटर ठरला आहे. त्यामुळेच यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार म्हणून रणवीरची निवड करण्यात आली. मुंबईत होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आलं.
बॉलीवूडसह विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तींचा सन्मान दरवर्षी लोकमतकडून करण्यात येतो. त्यातील बॉलीवूड गटात यंदा रणवीर सिंगनं बाजी मारली. रणवीर सिंगनं रामलीला, गुंडे, बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारखे एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. यातील बाजीराव मस्तानी, पद्मावत या सिनेमांमधील ऐतिहासिक व्यक्तीरेखा रणवीरनं अगदी उत्तमरित्या साकारल्या. या सिनेमांमधील त्याच्या लूकची मोठी चर्चा झाली. मात्र रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही रणवीरचा लूक अतिशय स्टायलिश असतो. त्याच्या या लूकची अनेकदा चर्चा झाली आहे. यामुळेच त्याची लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार म्हणून निवड करण्यात आली.