लंडन आणि दुबईच्या प्रेक्षकांनी कालच अनुभवला ‘बाहुबली-२’चा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 08:53 AM2017-04-28T08:53:31+5:302017-04-28T14:23:31+5:30

गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांची आज ‘बाहुबली-२’विषयीची प्रतीक्षा संपली आहे. आज शुक्रवारी (२८ एप्रिल) हा चित्रपट ...

London and Dubai audiences yesterday experienced 'Throwing Bahubali 2'! | लंडन आणि दुबईच्या प्रेक्षकांनी कालच अनुभवला ‘बाहुबली-२’चा थरार!

लंडन आणि दुबईच्या प्रेक्षकांनी कालच अनुभवला ‘बाहुबली-२’चा थरार!

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांची आज ‘बाहुबली-२’विषयीची प्रतीक्षा संपली आहे. आज शुक्रवारी (२८ एप्रिल) हा चित्रपट देशभरात रिलीज करण्यात आला असून, चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगाच रांगा बघावयास मिळत आहे. मात्र हा चित्रपट सर्वांत अगोदर भारतात नव्हे तर यूएई आणि लंडन येथे रिलीज करण्यात आला आहे. होय, काल म्हणजेच गुरुवारी (२७ एप्रिल) रोजीच लंडन आणि यूएई येथील प्रेक्षकांना ‘बाहुबली-२’चा थरार बघता आला आहे. 

असे म्हटले जात आहे की, भारताप्रमाणेच लंडन आणि यूएई (दुबई)मध्ये हा चित्रपट प्रचंड प्रमाणात पसंत केला गेला. त्यामुळेच त्याठिकाणी हा चित्रपट अगोदर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागात राणा दग्गुबाती हा राजा बनल्याची कथा दाखविण्यात आली आहे. ज्यामध्ये ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर मिळत असल्याने प्रेक्षकांना पुढच्या भागाची कमालीची आतुरता लागते. 

चित्रपटाच्या पहिल्या भागात देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी हिला बेड्यांमध्ये प्रेक्षकांनी बघितले होते. मात्र दुसºया भागात ती खूपच ग्लॅमर अंदाजात बघावयास मिळत आहे. शिवाय तिने केलेले अ‍ॅक्शन्स सीन्सदेखील थक्क करणारे आहेत. अनुष्का शेट्टी व्यतिरिक्त चित्रपटातील दुसरी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनेदेखील तिचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात तमन्ना, अवंतिका या नावाची भूमिका साकारत आहे. 

जर भल्लालदेव म्हणजेच राणा दग्गूबाती याच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास त्यानेदेखील सर्वोत्तम अभिनय करीत प्रेक्षकांना मोहित केले आहे. भल्लालदेव आणि अमरेंद्र बाहुबली यांच्यातील तुफान लढाई हा या चित्रपटातील केंद्रबिंदू असून, प्रेक्षक अक्षरश: या दोघांवर फिदा होत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणे सत्यराज यांनीदेखील सर्वोत्तम भूमिका साकारली आहे. ऐकूनच हा चित्रपट सर्वोत्तम असून, बॉक्स आॅफिसवर निर्विवाद वर्चस्व गाजवेल यात शंका नाही. 

Web Title: London and Dubai audiences yesterday experienced 'Throwing Bahubali 2'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.