पाहाताच क्षणी बॉबी देओल पडला होता तान्याच्या प्रेमात, वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 03:35 PM2020-12-31T15:35:54+5:302020-12-31T15:40:18+5:30
बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो.
बॉबी देओलने त्याच्या करियरची सुरुवात बरसात या चित्रपटापासून केली. त्यानंतर त्याने काही हिट चित्रपट दिले. पण गेल्या अनेक वर्षापासून तो बॉलिवूडपासून दूर होता. पण सलमानच्या रेस ३ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये रिएंट्री केली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. सध्या त्याची आश्रम ही वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या वेबसिरिजला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे.
अनेक अभिनेत्यांच्या पत्नी नेहमीच आपल्या पतीसोबत सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावत असतात. पण अभिनेता बॉबी देओलची पत्नी आपल्याला खूपच कमी कार्यक्रमात त्याच्यासोबत पाहायला मिळते. मात्र बॉबीच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्याच्या पत्नीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर दिसते.
बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. होय, बॉबी अगदी पहिल्याच नजरेत तान्याच्या प्रेमात पडला होता. बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली.
काहीच दिवसांत बॉबी आणि तान्या यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांच्या परिवारातील लोक एकमेकांना भेटले आणि लग्नाची बोलणी केली. बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी ‘चट मंगनी, पट ब्याह’ उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे. तान्या देखील स्वत: एक डिझाईनर आहे.