फाळणीच्या दु:खात फुलणारी प्रेमकथा

By Admin | Published: September 26, 2015 01:24 AM2015-09-26T01:24:46+5:302015-09-26T01:24:46+5:30

महान उर्दू कथाकार, पद्मश्री राजेंद्र सिंह बेदी हे मनाला स्पर्श करणाऱ्या कथांमुळे ओळखले जातात. त्यांचे उपन्यास ‘एक चादर मैली सी’साठी १९६५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले होते.

The love story of splintering painting | फाळणीच्या दु:खात फुलणारी प्रेमकथा

फाळणीच्या दु:खात फुलणारी प्रेमकथा

googlenewsNext

महान उर्दू कथाकार, पद्मश्री राजेंद्र सिंह बेदी हे मनाला स्पर्श करणाऱ्या कथांमुळे ओळखले जातात. त्यांचे उपन्यास ‘एक चादर मैली सी’साठी १९६५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले होते. नंतर त्या कथेवर चित्रपटही आला. ज्यामध्ये ऋषी कपूर आणि हेमा मालिनीने मुख्य भूमिका केली होती. बेदी यांनी याशिवाय ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अभिमान’, ‘अनुपमा’ आणि ‘सत्यकाम’ तसेच बिमल रॉय यांच्या ‘देवदास’, ‘मधुमती’सारख्या चित्रपटांसाठी संवाद (डायलॉग्स) देखील लिहिले आहेत. इतकेच नव्हे त्यांनी दस्तक (१९७०) आणि फागून (१९७३) चे दिग्दर्शनही केले होते..
आता बेदी यांच्या जन्मशताब्दीवर त्यांची आणखी एक चर्चित कथा ‘लाजवंती’वर आधारित मालिका २८ सप्टेंबरपासून झी टीव्हीवर सुरू होणार आहे. तिचे निर्माते बेदी यांचे नातू ऊला बेदी दत्ता, माणिक बेदी आणि रजत बेदी आहेत.
४०च्या दशकातील कथा ‘लाजवंती’ ही एक प्रेमकहाणी आहे. मात्र त्यात फाळणीचे दु:खही आहे आणि त्या काळातील वास्तवतेचे दर्शनही आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींमध्ये सुंदरलाल यांची पत्नी हरवते आणि जेव्हा ती सापडते तेव्हा दोन्ही देशांच्या संबंधामध्ये मोठे बदल झालेले असतात. बेदी यांनी संबंधांच्या घटना मोठ्या सुंदरतेने मांडल्या आहेत.
प्रेक्षकांना मिळणार चांगला बदल
- रजत बेदी
‘लाजवंती’च्या निर्मात्यांमधील एक रजत बेदी मोठ्या काळानंतर या मालिकेच्या माध्यमातून अभिनयाकडे वळत आहे. आपल्या आजोबांच्या कथेने प्रभावित झालेल्या रजत यांचे म्हणणे आहे की, ‘तसे मला बाबांच्या सर्व कथा आवडतात, मात्र मालिकेसाठी लाजवंतीला यासाठी निवडले की यामध्ये प्रेमही आहे आणि दु:खही आहे, जे सरळ मनाला भावते. यामध्ये आपल्याला फाळणीच्या वेदना आणि त्या वेळी महिलांना कशी वागणूक दिली जात होती हे दिसेल.

Web Title: The love story of splintering painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.