'लकी' सिनेमाच्या प्रिमिअरला तारें जमीन पर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:19 PM2019-02-08T19:19:17+5:302019-02-08T19:23:29+5:30
मुंबई आणि पुण्याच्या प्रिमिअरला मिळालेला भरघोस प्रतिसाद आमचा उत्साह अधिक वाढवून गेला.सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून लकी सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी मी मराठी सिनेसृष्टीचा आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचा खूप आभारी असल्याचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगतिले.
बी लाइव्ह प्रस्तुत, संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमा 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात धडकला आहे. या सिनेमाचा प्रिमिअर सोहळा नुकताच मुंबई आणि पुण्यात संपन्न झाला. मुंबई आणि पुण्याच्या प्रिमिअऱला मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनी थिएटर हाऊसफुल झाले होते.
प्रिमिअर सोहळ्यात डिस्को किंग बप्पी लहिरी ह्यांची विशेष उपस्थिती होती. सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे ,दिग्दर्शक संजय जाधव, लकी कपल दिप्ती सती आणि अभय महाजन तसेच म्युझिक डिरेक्टर पंकज पडघन आणि अमित राज यांच्याशिवाय अंकुश चौधरी,सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत,सोनाली खरे,हर्षदा खानविलकर,सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर,मिताली मयेकर ,अमेय वाघ,संतोष जुवेकर,आदर्श शिंदे,सावनी रविंद्र,संदिप पाठक,सुमित राघवन,चिन्मयी सुमित,श्रेया बुगडे, चंद्रकांत कनसे, नेहा शितोले,प्रसाद ओक, मिलिंद पाठक,रसिका वेंगुर्लेकर,मैथिली वारंग अश्या अनेक कलाकारांची उपस्थिती होती. हाऊसफुल गर्दीत मुंबईचा प्रिमिअर सोहळा संपन्न झाला.
पुण्याच्या प्रिमिअर सोहळ्यात प्रिया बापट, उमेश कामत,अक्षय टंकसाळे ,पर्ण पेठे,अलोक राजवाडे अश्या अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली. त्याचप्रमाणे या प्रिमिअरला लकी कपल दिप्ती सती आणि अभय महाजनचा फॅन क्लबही मोठ्या संख्येने उपस्थित होता. टाळ्या,शिट्यांचा भरघोस प्रतिसाद लकी सिनेमाला ह्या फॅन्सकडून मिळाला.
फॅन्सकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ’’लकी सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.मुंबई आणि पुण्याच्या प्रिमिअरला मिळालेला भरघोस प्रतिसाद आमचा उत्साह अधिक वाढवून गेला.सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून लकी सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी मी मराठी सिनेसृष्टीचा आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचा खूप आभारी आहे”.
निर्माते सुरज सिंग म्हणाले, “माझा हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि या सिनेमाला एवढा प्रतिसाद मिळताना पाहून मला फार भरून आलयं. मराठी सिनेसृष्टीकडून मिळत असलेल्या या पाठबळाने आणि रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळे मला फार गहिवरून आले. तसेच मी आदरणीय बप्पी दांचा खूप ऋणी आहे, ते वेळात वेळ काढून लकी सिनेमाच्या प्रिमिअरला आले”.
अभय महाजन म्हणाला, ”एवढ्या मोठ्या पद्धतीने झालेल्या माझ्या पहिल्या सिनेमाचे हे प्रिमिअर आहे. आजपर्यंत मी माझ्या आवडत्या कलाकारांच्या प्रिमिअरमध्ये जाऊन अनेक सेलिब्रेटींसोबत सेल्फी आणि फोटोज काढायचो. पण ह्यावेळेस सर्व कलाकार तसेच प्रेक्षकवर्ग माझ्यासोबत फोटोज काढत होते. तो अनुभव माझ्यासाठी फारच वेगळा होता. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होत त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर राहत नव्हता”.
दिप्ती सती म्हणाली, “माझा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे आणि मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांनी तसेच महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांनी लकी सिनेमाला एवढा भरघोस प्रतिसाद देवून माझं मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वागत केल आहे.त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता”.
'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' प्रस्तुत 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.