अन् मधुबालाची ही इच्छा अखेरपर्यंत राहिली अधुरी! ‘या’ सिनेमात हवी होती संधी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 12:46 PM2021-02-14T12:46:22+5:302021-02-14T12:47:13+5:30

Madhubala's Birthday: नवव्या वर्षी केली अभिनयाला सुरूवात, वेदनादायी झाला आयुष्याचा शेवट

Madhubala's Birthday: Know About The Yesteryear Icon On Her Birth Anniversary | अन् मधुबालाची ही इच्छा अखेरपर्यंत राहिली अधुरी! ‘या’ सिनेमात हवी होती संधी!!

अन् मधुबालाची ही इच्छा अखेरपर्यंत राहिली अधुरी! ‘या’ सिनेमात हवी होती संधी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबालाने शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी मधुबालाचे वय केवळ ३६ वर्षे होते.

सौंदर्याचे दुसरे नाव म्हणजे, मधुबाला. या मधुबालाने एकेकाळी आपल्या अभिजात सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले.  तिच्या अभिनयानेही सिनेप्रेमींना भुरळ पाडली. सौंदर्याची खाण असलेल्या याच मधुबालाची आज  जयंती. आजच्या दिवशीच मधुबालाचा जन्म झाला होता.

 14  फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीत मधुबालाचा जन्म झाला. तिचे खरे नाव, मुमताज जहां बेगम असे होते. 11 बहिणींत मधुबालाचा पाचवा क्रमांक होता. मधुबालाचे वडिल अताउल्लाह  पेशावर येथील तबांखूच्या कारखान्यात काम करायचे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि तेथून मुंबईला. 

सौंदर्याच्या बाबतीत मधुबालाची तुलना मर्लिन मन्रोशी केली जाते. मधुबाला एक अशी अभिनेत्री होती, जिने केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडलाही वेड लावले होते. कदाचित तिच्या सौंदर्यावर भाळूनचं ऑस्कर अवार्ड विनर दिग्दर्शक फ्रँक कापरा हे तिला हॉलिवूडमध्ये बे्रक देऊ इच्छित होते. पण मधुबालाला हॉलिवूडमध्ये जराही रस नव्हता.

मधुबालाने वयाच्या नवव्या वर्षी चित्रपटात काम केले. 1942 साली आलेल्या ‘बसंत’ या चित्रपटात मधुबालाने बालकलाकाराची भूमिका केली होती.  1947 मध्ये  ‘नीलकमल’ या सिनेमात ती अभिनेत्री म्हणून झळकली.  आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने 66 चित्रपटांत काम केले. पण तिची एक इच्छा मात्र शेवटपर्यंत अधुरी राहिली.

होय, मधुबालाला ‘रोटी, कपडा और मकान’चे दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘बिराज बहू’ या चित्रपटात काम करायचे होते. या सिनेमाची स्क्रिप्ट वाचून मधुबाला या चित्रपटाच्या प्रेमात पडली होती. या सिनेमात लीड भूमिका साकारण्याची तिची भरून इच्छा होती. मात्र मधुबाला त्यावेळी टॉपची अ‍ॅक्ट्रेस होती. त्यामुळे तिची फी आपल्याला परवडणार नाही, असा विचार करून बिमल रॉय यांनी  मधुबालाऐवजी कामिनी कौशलला या सिनेमासाठी साईन केले होते. मधुबालाला आयुष्यभर ‘बिराज बहू’ हातचा गमावल्याची याची खंत होती. बिमल रॉय यांनी केवळ पैशामुळे आपल्याला कास्ट केले नाही, हे कळल्यावर तर ती आणखीही दु:खी झाली होती. मला कारण माहित असते तर मी 1 रूपयांच्या साईनिंग अमाऊंटवर हा सिनेमा केला असता, असे ती म्हणाली होती.

 ‘बिराज बहू’ हा चित्रपट 1954 मध्ये प्रदर्शित झाला होता. शरदचंद्र चटोपाध्याय लिखीत ‘बिराज बहू’ याच नावाच्या बंगाली कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता.

मधुबालाला एक नव्हे अनेक आजार होते. तिच्या  हृदयाला  छिद्र होते. पण तिच्या फुफ्फुसांतही समस्या होती. याशिवाय एक दुर्मिळ आजारही तिला होता. त्यामुळे तिच्या शरिरात आवश्यकतेपेक्षा अधिक मात्रेत रक्त तयार व्हायचे. मग हे रक्त नाक व तोंडावाटे वाहत असते. अतिरिक्त मात्रेतील रक्त बाहेर पडेपर्यंत हा रक्तस्त्राव सुरु असायचा. यामुळे मधुबाला विव्हळत असायची. वेदनांनी बेजार व्हायची. तिची स्थिती इतकी खराब होती की, डॉक्टर रोज घरी येऊन तिच्या शरिरातून अनेक बाटल्या रक्त काढायचे. शेवटच्या काळात प्रत्येक चार तासांत तिला आॅक्सिजन द्यावा लागायला. या आजारांनी तब्बल नऊ वर्षे मधुबालानी विव्हळत काढली.  उपचारासाठी तिला इंग्लंडलाही नेण्यात आले. पण मधुबालाची स्थिती पाहता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला. त्यामुळे मधुबालाला हे कळून चुकले होते की, ती जास्त दिवस जगणार नाही. अखेर 23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबालाने शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी मधुबालाचे वय केवळ ३६ वर्षे होते.

Web Title: Madhubala's Birthday: Know About The Yesteryear Icon On Her Birth Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.