'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:28 PM2024-05-15T15:28:21+5:302024-05-15T15:28:53+5:30
त्याकाळी माधुरी आणि अनिल कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा माधुरीने हे वक्तव्य केले होते.
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि माधुरी दीाक्षित (Madhuri Dixit) हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी. ८०-९० च्या दशकात या लोकप्रिय जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 'तेजाब' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून त्यांनी सुपरहिट सिनेमांची रांगच लावली. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चाही चांगल्याच गाजल्या होत्या. खऱ्या आयुष्यातही दोघांनी लग्न करावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नव्हतं. उलट माधुरीने अनिल कपूरसारखा पती नको असं वक्तव्य केलं होतं.
अनिल कपूर तेव्हा विवाहित होता आणि तेव्हा सोनमचाही जन्म झाला होता. त्यामुळे त्याच्या आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चा फक्त अफवाच होत्या. माधुरीने ना केवळ या चर्चा नाकारल्या उलट तिने अनिल कपूरसारखा पती नको असंही वक्तव्य केलं. 1989 साली आलेल्या 'राम लखन' सिनेमानंतर 'हॉल ऑफ फेम' ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, "नाही, मी त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत लग्न करणार नाही. अनिल अतिसंवेदनशील आहे. मला वाटतं की माझ्या पतीने कूल असावं. अनिल बाबतीत सांगायचं तर मी त्याच्यासोबत बरेच चित्रपट केले आहेत. त्यामुळेच मी त्याच्यासोबत कंफर्टेबल असते. आमच्या कथित अफेअरवरुनही मी त्याच्यासोबत मजामस्ती करते."
अनिल कपूरचं 1984 सालीच सुनीतासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर एका वर्षातच सोनमचा जन्म झाला. माधुरीने 1984 साली 'अबोध' सिनेमातून पदार्पण केलं. तिचे सुरुवातीचे सिनेमे फारसे चालले नाहीत. 1988 साली आलेल्या 'तेजाब' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. तर अनिल कपूर 1979 पासूनच सिनेमांमध्ये होता. त्याला 1984 साली आलेल्या 'मशाल' सिनेमामुळे ओळख मिळाली.
माधुरीने नंतर 1999 साली डॉ श्रीराम नेनेंशी लग्न केले आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली. यशाच्या शिखरावर असताना ती लग्नबंधनात अडकली.