'अग्गंबाई सूनबाई' फेम प्रसिद्ध अभिनेत्याची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 07:12 PM2024-02-21T19:12:25+5:302024-02-21T19:20:13+5:30

Marathi actor: हा अभिनेता जवळपास 8 वर्षानंतर स्टार प्रवाहवर कमबॅक करत आहे.

maeathi actor ashutosh patki entry in new tv show gharoghari matichya chuli | 'अग्गंबाई सूनबाई' फेम प्रसिद्ध अभिनेत्याची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

'अग्गंबाई सूनबाई' फेम प्रसिद्ध अभिनेत्याची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच येत्या १८ मार्चपासून स्टार प्रवाहवर घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिका साकारणार असून आता या मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
 
सध्या मराठी कलाविश्वामध्ये घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या या मालिकेतील भूमिकांवरील पडदा दूर सारला जात आहे. यामध्येच आता सौमित्र रणदिवे या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. ही भूमिका लोकप्रिय अभिनेता आशुतोष पत्की साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आला आहे.

‘स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा. मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. मालिकेची टीम उत्तम आहे त्यामुळे काम करताना धमाल येतेय, असं आशुतोष म्हणाला.

दरम्यान, या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ८ वर्षांनी तो स्टार प्रवाहसोबत काम करणार आहे.  या मालिकेत त्याच्यासोबत सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.

Web Title: maeathi actor ashutosh patki entry in new tv show gharoghari matichya chuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.