काय म्हणता? अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर !!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:13 PM2019-10-31T14:13:29+5:302019-10-31T14:14:40+5:30

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनता विचारतेय.

maharashtra legislative assembly issue fans wants anil kapoor as chief minister | काय म्हणता? अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर !!

काय म्हणता? अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर !!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘नायक’ या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनला होता. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनता विचारतेय. सोशल मीडियाने मात्र हा गुंता सोडवत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी अभिनेता अनिल कपूरचे नाव सुचवले आहे. होय, अनिल कपूरला मुख्यमंत्री करा, असा पर्याय नेटक-यांनी पुढे केला आहे.
 ‘ शिवसेना-भाजपातील मुख्यमंत्रिपदावरून सुरु असलेला गुंता सुटत नाही तोपर्यंत अभिनेता अनिल कपूरला मुख्यमंत्री बनवू पाहू शकतो. पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ संपूर्ण देशाने बघितला आहेच. देवेंद्र फडणवीस  आणि आदित्य ठाकरे तुमचा काय विचार आहे?, ’ असे ट्विट विजय गुप्ता नामक एका ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.




तूर्तास हे ट्विट वा-याच्या वेगाने व्हायरल होत असून नेटक-यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे, खुद्द अनिल कपूर यांनीही यावर मजेशीर उत्तर देत, ‘ मै नायक ही ठीक हूँ’ असे म्हटले आहे.




‘नायक’ या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनला होता. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिलने शिवाजी राव नामक व्यक्तिरेखा जिवंत केली होती. पत्रकार असणारा शिवाजी राव मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. त्याच्या या आव्हानानंतर विद्यमान मुख्यमंत्री त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री पद देऊ करतात. या एका दिवसात तो राज्याचा चेहरामोहरा बदलतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटात अनिल कपूर यांनी साकारलेला ‘नायक’ अद्यापही चाहत्यांच्या आठवणीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नेटक-यांनी अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला दिला आहे. 

Web Title: maharashtra legislative assembly issue fans wants anil kapoor as chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.