'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:27 PM2024-12-03T16:27:15+5:302024-12-03T16:27:39+5:30
हास्यजत्रेच्या कलाकारांनी सेटवरच मोठ्या जल्लोषात दत्तूचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. हास्यजत्रेच्या मंचाने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. या शोमुळेच अभिनेता दत्तात्रय मोरे घराघरात पोहोचला. लाडक्या दत्तूने अभिनय आणि टॅलेन्टच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आज दत्तूचा वाढदिवस आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी सेटवरच मोठ्या जल्लोषात दत्तूचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हास्यजत्रेच्या शूटिंगलाही पुन्हा सुरुवात झाली आहे. या दरम्यानच सेटवर दत्तूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापत हास्यजत्रेच्या कलाकारांनी लाडक्या दत्तूचा वाढदिवस साजरा केला. यावेळा समीर चौघुले आणि प्रियदर्शिनी इंदलकरने दत्तूच्या स्किटमधील काही फेमस स्टेप्स केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
दत्तूच्या वाढदिवसानिमित्त कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. दत्तूने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. दत्तूने गेल्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्याच्या पत्नीचं नाव स्वाती असून ती एक डॉक्टर आहे. गुपचूप लग्न करत दत्तूने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.