३० वर्षांमधली माझी सर्वात मोठी कमाई म्हणजे...; 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातची भावुक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:30 AM2024-07-24T11:30:11+5:302024-07-24T11:33:48+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (maharashtrachi hasyajatra, vanita kharat)

maharashtrachi hasyajatra fame vanita kharat birthday celebration photos viral | ३० वर्षांमधली माझी सर्वात मोठी कमाई म्हणजे...; 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातची भावुक पोस्ट चर्चेत

३० वर्षांमधली माझी सर्वात मोठी कमाई म्हणजे...; 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातची भावुक पोस्ट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. वनिता हास्यजत्रेमधील विविध भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. वनिता खरातचा नुकताच वाढदिवस झाला. वनिताने वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन केलं. वनिताच्या वाढदिवसाला हास्यजत्रेमधील अनेक कलाकार सहभागी होते. वनिताने 'हास्यजत्रा' परिवारासोबत दणक्यात बर्थडे सेलिब्रेशन केलंय. 

वनिताची बर्थडेनिमित्त भावुक पोस्ट

वनिताने बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करुन पोस्ट लिहिलीय की,  "19-07-2024.. Entering my 30's with a banger! With, A little La-La-La with my partner, A little Ha-Ha-Ha with my friends, A little Cha-Cha-Cha with my art, and a little OO-La-La with myself! All set for New adventures, new challenges, new skills and new craft With ३० वर्षांचा अनुभव, ३० वर्षांची शिकवण आणि ३० वर्षांमधली माणसं! माणसं.... या ३० वर्षांमधील माझी सर्वात मोठी कमाई! सगळ्यांच्या प्रेमाने फुलत गेले,अशीच आणखीन बहरत जाईन आणि दरवळत राहीन ! तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची कायमची ऋणी !" 

वनिताच्या बर्थडेला अवतरलं हास्यजत्रा कुटुंब

वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये बघता येईल की तिच्यासमोर तीन केक ठेवलेले दिसतात. यात एक केक मोठा दिसत असून त्यावर वनिताचा फोटो पाहायला मिळतो.  यावेळी 'हास्यजत्रे'मधील सर्व कलाकार वनितासोबत एका हॉटेलमध्ये दिसतात. या सर्वांनी एकत्र येऊन वनितासोबत खास फोटोशूट करुन धमाल केलेली दिसली. वनिताचा नवरा सुमित लोंढेने यावेळी पत्नीसोबत रोमँटिक फोटोशूट केलं.

 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame vanita kharat birthday celebration photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.