अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:10 AM2024-09-19T10:10:23+5:302024-09-19T10:11:21+5:30

चेतना भटने फोटो शेअर करत झलक दाखवली आहे.

maharashtrachi hasyajatra team on USA tour started rehearsing at paris airport | अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra)  फेम कलाकारांनी जगभरात डंका वाजवला आहे. म्हणूनच त्यांचे देशाबाहेरही शो होत आहेत. नुकतंच हास्यजत्रेची टीम अमेरिकेला रवाना झाली आहे. दीड महिना ते अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करणार आहेत. दरम्यान त्यांचा पॅरिस विमानतळावरचा एक फोटो व्हायरल होतोय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा ची टीम परदेशातही परफॉर्म करते. सध्या भारतात कार्यक्रमाला विश्रांती आहे. सर्वजण USA टूरवर आहेत. आजपासून त्यांचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. एकूण ११ शहरांमध्ये टीम परफॉर्म करणार आहे. दरम्यान अमेरिकेला जात असताना पॅरिस विमानतळावर त्यांचा स्टॉप होता. अमेरिकेला पोहोचताच त्यांना लगेच शो असल्याने त्यांनी पॅरिसच्या विमानतळावरच स्किटची प्रॅक्टिस केली. चेतना भटने याची झलक दाखवली आहे. सगळे खाली बसून स्क्रीप्ट वाचत आहेत तर प्रसाद खांडेकर सेल्फी घेतोय. चेतनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले, 'पॅरिस विमानतळावर आमची रिहर्सल'. 

दरम्यान या अमेरिका दौऱ्यासाठी प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे, चेतना भट, ओंकार राऊत, दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, इशा डे, प्रभाकर मोरे अशी अख्खी टीम रवाना झाली आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी टीम सज्ज आहे. याआधी हास्यजत्रेच्या टीमने ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर येथेही परफॉर्म केले आहे. परदेशात त्यांची जादू आणखी पसरत चालली आहे.

Web Title: maharashtrachi hasyajatra team on USA tour started rehearsing at paris airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.