जे बात..! २०० कोटींच्या चित्रपटासाठी महेश बाबू आणि राम चरण आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:21 PM2021-12-11T19:21:26+5:302021-12-11T19:21:55+5:30
Mahesh Babu and Ram Charan join hands for Big Budget Movie: लेटेस्ट रिपोर्टनुसार, महेश बाबू आणि राम चरण बिग बजेट चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत सध्या मल्टीस्टारर चित्रपटांचा काळ सुरू आहे. बरेच दिग्गज अभिनेते एकमेकांसोबत हातमिळवणी करत आहेत. त्यामुळे चाहतेदेखील खूप खूश आहेत. मल्टीस्टारर चित्रपटांचा हा फायदा असतो की प्रेक्षकांना अशा चित्रपटात एक नाही तर दोन मोठे नायक पाहायला मिळतात. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि महेश बाबू (Mahesh Babu) एका बिग बजेट चित्रपट साइन करण्याचा विचार करत आहेत.
बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, महर्षी दिग्दर्शक वामसी पेडिपल्ली यांनी राम चरण आणि महेश बाबू यांना आगामी चित्रपटासाठी अप्रोच केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंद करमार आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर जाईल.
दोन्ही अभिनेत्यांची भूमिका असणार दमदार
कॉलिवूडचे दिग्दर्शक लोकेश कनगराज हे महेश बाबू आणि राम चरण यांना घेऊन चित्रपट बनवण्याची योजना आखत आहेत. या चित्रपटाच्या कथेसंदर्भातील जास्त माहिती समोर आलेली नाही. मात्र असे सांगितले जात आहे की, यात दोन्ही अभिनेत्यांची भूमिका दमदार असणार आहे. राम चरण आणि महेश बाबू लोकेश कनगराज यांच्या चित्रपटाच्या कामाला सुरूवात कधी करतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.