महेश बाबूने सांगितले त्याच्या 15 वर्षांच्या लग्नाचे सिक्रेट, नम्रता शिरोडकरपेक्षा आहे तो इतक्या वर्षांनी लहान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 07:00 AM2020-04-18T07:00:00+5:302020-04-18T07:00:00+5:30

महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावाई आहे.

Mahesh babu relevas his success married life secrets gda | महेश बाबूने सांगितले त्याच्या 15 वर्षांच्या लग्नाचे सिक्रेट, नम्रता शिरोडकरपेक्षा आहे तो इतक्या वर्षांनी लहान

महेश बाबूने सांगितले त्याच्या 15 वर्षांच्या लग्नाचे सिक्रेट, नम्रता शिरोडकरपेक्षा आहे तो इतक्या वर्षांनी लहान

googlenewsNext

साऊथ इंडस्ट्रीमधले सुपरस्टार महेश बाबू याचे खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे.महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावाई आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर त्याची पत्नी आहे.

काही महिन्यांपूर्वी दिलेल्या राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार महेश बाबूने त्याच्या 15 वर्षांच्या लग्नाचे सीक्रेट रिवील केले आहे. रिपोर्टनुसार महेश म्हणाला की, मी आणि नम्रता नेहमीच एकमेकांना समजून घेतो. एकमेकांना स्पेसदेखील देतो. तसेच आमच्या लग्नाचे सीक्रेट आमची मुलं देखील आहेत. हे सगळं मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे. पुढे तो म्हणाला, घरात असताना एक स्टार प्रमाणे नाही तर सामान्य माणसांसारखा वावरतो.

2000 साली तेलुगू सिनेमा वापसी च्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास 5 वर्षे दोघ एकमेकांना डेट करत होते. 2005मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले. नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे. फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. मात्र लग्नानंतर नम्रता सिनेमांमध्ये कमी आणि संसार जास्त रमली.

महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, महेश बाबू एका सिनेमासाठी 20 कोटींचे मानधन घेतो. महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्यातच्या बॅनर खाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

Web Title: Mahesh babu relevas his success married life secrets gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.