महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:31 PM2020-07-02T12:31:26+5:302020-07-02T12:32:14+5:30

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे.

Mahesh Bhatt Daughter Shaheen Bhatt Is Alia Bhatt's Older Sister; Here Are Some Lesser-known Facts About Her | महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि बडे कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंबीय. हिंदी चित्रपटसृष्टीत भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असतं. भट्ट कुटुंबीयांच्या सिनेमांची ही खास बात असते. महेश भट्ट हे बॉलीवुडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक. आजवर अनेक हिट सिनेमा भट्ट कॅम्पने दिले आहेत. सिनेमांसह विविध गोष्टींमुळे भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असते. महेश भट्ट हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत तर मुकेश भट्ट हे निर्माते आहेत. महेश भट्ट यांच्या लेकींनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे. मात्र महेश भट्ट यांना तिसरी लेकही आहे आणि तिच्याबाबत फारसं कुणालाही माहिती नाही. कॉलेजमध्ये असताना महेश भट्ट यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लोरिएन ब्राईट नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर महेश भट्ट यांनी लोरिएनचं नाव किरण भट्ट असं केलं.

महेश आणि किरण यांची दोन मुलं आहेत. एक पूजा भट्ट आणि दुसरा राहुल भट्ट. यानंतर महेश भट्ट यांचे सोनी राजदान यांच्याशी सूत जुळले. सोनी राजदानशी लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी असून एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट्ट असं आहे. 

1988 साली शाहिनचा जन्म झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली. एका मुलाखतीमध्ये आलियानं याबाबत कबुली दिली होती.

डिप्रेशनसह निद्रानाश या आजाराने शाहिन त्रस्त होती. शाहिन कधीही अभिनय करताना दिसली नाही. मात्र ती या ना त्या कारणामुळे सिनेमाशी जोडली गेली आहे. 'जिस्म-2', 'जहर' या सिनेमासाठी तिने डायलॉग्स लिहले होते. तसंच 'राज-3' सिनेमात शाहिननं सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 
 

Web Title: Mahesh Bhatt Daughter Shaheen Bhatt Is Alia Bhatt's Older Sister; Here Are Some Lesser-known Facts About Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.