महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:59 IST2025-04-23T13:58:34+5:302025-04-23T13:59:03+5:30

लेक पूजासोबत महेश भट यांच्या लिप किस पहिल्यांदाच बोलला मुलगा राहुल म्हणाला- "आम्ही हे लहानपणासून बघत आलोय..."

mahesh bhatt son rahul reacted on father and sister pooja bhatt lip kiss | महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."

महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट अनेकदा कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आले आहेत. ९०च्या दशकात त्यांनी लेक पूजा भटसोबत केलेल्या मॅगझीन फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली होती. मॅगझीनच्या कव्हर पेजवर त्यांचा आणि पूजा भटचा लिप किस करतानाचा फोटो छापून आला होता. त्यामुळे प्रचंड चर्चा रंगली होती. या फोटोमुळे महेश भट आणि पूजा भटला ट्रोलही केलं गेलं होतं. आता इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच महेश भट यांच्या मुलाने भाष्य केलं आहे. 

महेश भट यांचा मुलगा राहुल भटने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी तेव्हा १३-१४ वर्षांचा असेन. आमच्याकडे या गोष्टी होत नाहीत. फिल्म इंडस्ट्रीतल्या कुटुंबातील मुलं ही एक तर खूप मजबूत असतात किंवा खूप चिंतेत असतात. काही गोष्टींमध्ये आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण, सत्य काय आहे हे आम्हाला माहीत असतं. आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. जीवेमारण्याची धमकी, इनकम टॅक्स रेड, मारामारी...हे सगळं लहानपणापासून बघितलंय. त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. या सगळ्यांची तुम्हाला सवय होऊन जाते. पण, यामुळे मी कठोर बनलो नाही तर मी स्वत:ला अजून चांगलं बनवलं". 

राहुल भट हा महेश भट आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच राहुलनेही इंडस्ट्रीत नाव कमावण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. एक अभिनेता असण्याबरोबरच राहुल एक फिटनेस ट्रेनरही आहे. महेश भट आणि किरण भट यांना राहुल आणि पूजा भट ही दोन मुले आहेत. 

Web Title: mahesh bhatt son rahul reacted on father and sister pooja bhatt lip kiss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.