Panghrun Trailer: ही अनोखी गाठ कोणी बांधली...! पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी, ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:41 PM2022-01-24T16:41:24+5:302022-01-24T16:48:32+5:30

Panghrun Movie : कोकणाच्या निगर्सरम्य वातावरणात स्वातंत्र्यापूर्वीच्या एका विलक्षण प्रेमकहाणीची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय.

Mahesh Manjrekar Directorial Panghrun Trailer Released Gauri Ingwale Amol Bawdekar Rohit Phalke | Panghrun Trailer: ही अनोखी गाठ कोणी बांधली...! पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी, ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रदर्शित

Panghrun Trailer: ही अनोखी गाठ कोणी बांधली...! पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी, ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रदर्शित

googlenewsNext

 Panghrun Movie : काकस्पर्श  आणि नटसम्राट यासारख्या दर्जेदार चित्रपटानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) व झी स्टुडिओजचा बहुचर्चित आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘पांघरूण’ असं या सिनेमाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. सोशल मीडियावर या टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या गाण्यांनीही प्रेक्षकांची दाद मिळवली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत  आहे.

लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे तिच्या वडिलांच्या वयाच्या थोराड माणसाशी लग्न होतं. वयाने मोठ्या असणाऱ्या या साथीदाराबद्दलची तिची नैसर्गिक ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. कोकणाच्या निगर्सरम्य वातावरणात स्वातंत्र्यापूर्वीची एक विलक्षण प्रेमकहाणीची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय.

युट्युबवर काही तासांत   20 हजारांवर लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.  महेश मांजरेकर दिग्दर्शित या   गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  येत्या 4 फेबु्रवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Mahesh Manjrekar Directorial Panghrun Trailer Released Gauri Ingwale Amol Bawdekar Rohit Phalke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.