तो वरवर आनंदी दिसतो पण आतून तितकाच एकटा ..., महेश मांजरेकरांना का सतावतेय सलमानची चिंता?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:53 PM2021-11-02T15:53:58+5:302021-11-02T15:54:38+5:30
महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) सलमान खानबद्दल (Salman Khan) सांगितल्या इंटरेस्टिंग गोष्टी...वाचा...
‘यह आदमी इतना सक्सेसफुल है. इतना सक्सेस है इसके पास, लेकिन उसके पीछे जो आदमी है, वो एकदम टिपिकल मिडल क्लास आदमी है,’ हे शब्द आहेत दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे. कोणाबद्दलचे तर बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानबद्दलचे (Salman Khan) .
होय, सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर सलमानबद्दल भरभरून बोलले. शिवाय सलमान भलेही वरवर आनंदी दिसतो. पण आतून तो एकदम एकटा आहे. आता त्यानं लग्न करावं अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले.
सोफ्यावर पडून राहतो सलमान...
महेश मांजरेकर म्हणाले, सलमान म्हणायला इतका मोठा स्टार आहे. पण कुठं राहतो तर एका साध्या 1 बीएचके फ्लॅटमध्ये. मी जेव्हाकेव्हा त्याच्या घरी जातो, तो त्याच्या ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर पहुडलेला दिसतो. कधी कधी वाटतं, या माणसाकडे इतकं यश आहे पण याच्या आत एकदम टीपिकल मिडल क्लास माणूस आहे. त्याच्या घरी गेलो की, मला एसी सुरू करावा लागतो. सलमानला एसीची वगैरे अजिबात गरज नसते. एसी बंद करून तो अगदी मजेत राहतो.
सलमान एकटा...
मांजरेकर पुढे म्हणाले, सलमानला एका लाईफ पार्टनरची गरज आहे, असं मला मनापासून वाटतो. सलमानच्या सोबतची सगळी माणसं चांगली आहेत. त्याचे मित्रही चांगले आहेत. सर्वजण सलमानवर मनापासून प्रेम करतात. पण हे सर्व लोक सरतेशेवटी आपआपल्या लोकांकडे परततात. सलमानने कोणाकडे परतावं? त्याच्या भावांचं स्वत:चं आयुष्य आहे. बहिणींचा स्वत:चा संसार आहे. म्हणूनच सलमानला त्याचं स्वत:चं सुखदु:ख शेअर करणा-या व्यक्तिची गरज आहे, असं मला वाटतं.
मला सलमानचा मुलगा पाहायचायं...
मी लग्नाबद्दल बोलतो तेव्हा सलमान विषय बदलतो. पण मला त्याचा मुलगा पाहायचायं. मी त्याच्यासोबत काहीही बोलू शकतो. लग्न कर म्हणून मी सतत त्याच्यामागे तगादा लावतो. तो टाळतो. पण त्याला कुणाची तरी गरज आहे, हे मला सतत जाणवतं. तो वरवर जितका आनंदी दिसतो, तितकाच आतून एकटा आहे, असंही मांजरेकर म्हणाले.