'कच्चा लिंबू' ते 'म्होरक्या'... राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा झेंडा; नागराज मंजुळेचा 'चौकार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:11 PM2018-04-13T12:11:11+5:302018-04-13T12:16:18+5:30
नागराज मंजुळेच्या आतापर्यंतच्या चारही लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्लीः भारतीय सिनेसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात मराठीची पताका यंदाही फडकली आहे. मराठी सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये नेण्याची 'झिंगाट' कामगिरी करणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'पावसाचा निबंध' या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे, याआधी 'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि 'सैराट' या नागराजच्या कलाकृतींनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यंदाच्या पुरस्कारांमध्ये सुयश शिंदेचा 'मय्यत' हा लघुपट सर्वोत्कृष्ट काल्पनिक लघुपट ठरलाय.
अमर देवकर दिग्दर्शित 'म्होरक्या'नं सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचं बक्षीस पटकावलंय. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या 'कच्चा लिंबू'वर वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाची मोहोर उमटली आहे. 'धप्पा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरवण्यात आलंय. राजेंद्र जंगलेची 'चंदेरीनामा' बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर 'मृत्यूभोग' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला 'न्यूटन' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर, 'बाहुबलीः द कन्क्लूजन' या सुपरहिट चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये भव्य-दिव्य कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरीः
सुवर्णकमळः व्हिलेज रॉकस्टार (आसामी चित्रपट)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटः बाहुबलीः द कन्क्लूजन
सर्वोत्कृष्ट बालचित्रपटः म्होरक्या
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपटः इरादा
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटः आलोरुक्कम
सर्वोत्कृष्ट अभिनेताः रिधी सेन (नागरकीर्तन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः जयराज (भयानकम)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः येसुदास
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः साशा त्रुपाती
सर्वोत्कृष्ट बालकलाकारः भानिता दास (व्हिलेज रॉकस्टार)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीः दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेताः फहाद फाजिल
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतः ए आर रेहमान (मॉम)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टरः अब्बास अली मोघुल (बाहुबलीः द कन्क्लूजन)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनः टॉयलेट - एक प्रेमकथा, गणेश आचार्य
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सः बाहुबलीः द कन्क्लूजन
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटः न्यूटन
इतर पुरस्कार :
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह
सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.