'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील समीर उर्फ संकर्षण कऱ्हाडेचं नवीन क्षेत्रात पदार्पण, वाचून तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:45 AM2022-03-17T11:45:37+5:302022-03-17T11:46:28+5:30
Sankarshan Karhade: समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने साकारली आहे. संकर्षण कऱ्हाडेने नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. तसेच या मालिकेतील छोटी परीने देखील आपल्या अभिनयाने सर्वांना चांगलीच भुरळ घातली आहे. याशिवाय यश आणि त्याचा मित्र समीर
यांची मैत्रीदेखील सर्वांना खूप आवडते. समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने साकारली आहे. संकर्षण कऱ्हाडेने नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो आता अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शन करताना दिसणार आहे. याबद्दल त्यानेच सोशल मीडियावर सांगितले आहे.
संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून लिहिले की, सारखं काहीतरी होतंय ….दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच काम करतोय. लेखक म्हणुन नाटकाचे वाचन जेव्हा प्रशांत दामले सरांसमोर केले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया हीच होती ..“तूच डायरेक्टर….” ध्यानी मनी नव्हतं माझ्या असं काही.. पण सरांनी ही संधी दिली आहे.. काल नाटकाचे संगीत झाले.. ते “अशोक पत्की” काकांनी अर्थातच अप्रतिमच केले आहे. वर्षा उसगांवकर , अशोक पत्की काका आणि प्रशांत दामले सर या लोकांसोबत दिग्दर्शक म्हणून काम करतांना …. कसं सांगु .. काय सांगु .. कित्ती सांगु …. पण खरंच .. मनामध्ये “सारखं काहीतरी होतंय..”
त्याने पुढे या पोस्टमध्ये म्हटले की, तुमच्या शुभेच्छा पाठीशी असू द्या बास.. २५ मार्च पासून नाटकाचा शुभारंभ आहे.. नक्की या .. पहा .. आणि सांगा .. कसं वाटलं ..!!
अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते प्रशांत दामले अनेक वर्षानंतर नाटकातून एकत्रित पाहायला मिळणार आहेत.