अशी सेलिब्रेट केली समर-सुमीने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा दोघांची खास केमिस्ट्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:35 PM2020-01-15T12:35:54+5:302020-01-15T12:37:23+5:30

Mrs Mukhyamantri Serial : मकर संक्रातीला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाची साडीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे यावेळी सुमी हलव्याचे दागिणे आणि काळ्या रंगाच्या साडीत दिसणार आहे.

Makar Sankranti Celebration OF Samar And Sumi of 'Mrs Mukhyamantri' See Their Pics | अशी सेलिब्रेट केली समर-सुमीने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा दोघांची खास केमिस्ट्री !

अशी सेलिब्रेट केली समर-सुमीने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा दोघांची खास केमिस्ट्री !

googlenewsNext

 छोट्या पडद्यावरील  'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.   या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.  त्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतं. अल्पावधीतच सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने रसिकांची पसंती मिळाली आहे. तसेच  'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून अमृताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.



मालिकेत आता सगळेच सेलिब्रेशनचा मुडमध्ये असल्याचे पाहायला मिळणार आहे.  ही मकर संक्रांत सुमीसाठी तशी खासच आहे.  कारण समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्याने मामी आणि घरातील सगळी मंडळी हा सण दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी सुमीने खास तयारी ही केली आहे.  एका वेगळ्याच लूकमध्ये ती दिसणार आहे. मकर संक्रातीला  हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाची साडीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे यावेळी सुमी  हलव्याचे दागिणे आणि काळ्या रंगाच्या साडीत दिसणार आहे.

हलव्याच्या दागिन्यांमुळे सुमीचे सौंदर्य अगदी खुलून आलंय. समर आणि सुमीच्या चेह-यावर आनंदही ओसंडून वाहताना दिसतोय. सुमीने घरातील सर्व सुवासिनींना हळदी-कुंकू लावून हा सण साजरा केला. 'मिसेस मुख्यमंत्री'चा हा मकरसंक्रांती स्पेशल भाग लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

Web Title: Makar Sankranti Celebration OF Samar And Sumi of 'Mrs Mukhyamantri' See Their Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.