क्रिकेटपटूला डेट करा, प्रसिद्धी झोतात राहा - रिचा चढ्ढाला मिळाला होता सल्ला

By Admin | Published: April 14, 2015 12:08 PM2015-04-14T12:08:19+5:302015-04-14T12:17:19+5:30

सतत चर्चेत राहून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभिनेत्री रिचा चढ्ढाला क्रिकेटपटूला डेट करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Make a deal to the cricketer, stay in the limelight - the advice was received by Richa Chaddha | क्रिकेटपटूला डेट करा, प्रसिद्धी झोतात राहा - रिचा चढ्ढाला मिळाला होता सल्ला

क्रिकेटपटूला डेट करा, प्रसिद्धी झोतात राहा - रिचा चढ्ढाला मिळाला होता सल्ला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १४ - प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अभिनेत्रींना अथक मेहनत घ्यावी लागते. सतत चर्चेत राहून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभिनेत्री रिचा चढ्ढाला क्रिकेटपटूला डेट करण्याचा सल्लाही एकाने दिला होता. मात्र रिचाने तो प्रस्ताव धुडकावून लावला. 
ओय लकी ओय, फुकरे, तमंचे या चित्रपटांमधील अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडणारी अभिनेत्री रिचा चढ्ढा आता स्वतःच्या म्हणजेच अभिनेत्रींच्या आयुष्यावर एक शॉर्ट फिल्म तयार करत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिद्धीत राहण्यासाठी व काम मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत दाखवली जाणार आहे. याविषयी बोलताना रिचाने तिला मिळालेले भन्नाट सल्ले जगजाहीर केली. रिचा म्हणते, मनोरंजन क्षेत्रात आल्यावर मला अनेक सल्ले मिळाले. चांगल्या उत्पादनांची जाहिरात करण्यापासून ते ख्यातनाम व्यक्तींच्या शाही विवाह सोहळ्यात डान्स करण्याचे सुचवण्यात आले. काहींनी सिनेमात आयटम नंबर कर असेही सांगितले. पण सर्वात अजब सल्ला होता तो क्रिकेटपटूला डेट करण्याचा. क्रिकेटपटूला डेट केल्याने प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल असे त्या महाशयाने मला सांगितले होते अशी आठवण रिचाने सांगितली. 
 
आलिया भटने काही महिन्यांपूर्वी एआयबीसोबत एक गमतीदार शॉर्टफिल्म केली होती. यात आलियाने स्वतःची चांगलीच खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मिडीयावरही लोकप्रिय ठरला होता. आता त्याच धर्तीवर रिचा चढ्ढाही एक शॉर्टफिल्म तयार करत आहे. चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिनेत्री सिनेनिर्मार्त्यांना डेट करतात, रेव्ह पार्ट्यांमध्येही जातात अशा अनेक गोष्टींची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगलेली असते. यासर्व बाबींचा खुलासा या शॉर्ट फिल्ममधून करणार असल्याचे रिचाने सांगितले. 

 

Web Title: Make a deal to the cricketer, stay in the limelight - the advice was received by Richa Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.