मेकअपने केला मेकओव्हर
By Admin | Published: February 6, 2016 02:12 AM2016-02-06T02:12:14+5:302016-02-06T02:12:14+5:30
ऋषी कपूर यांनी ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातील त्यांच्या स्पेशल लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ते त्यांच्या वयाच्या कितीतरी जास्तपट वयाचे दिसत आहेत.
ऋषी कपूर यांनी ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातील त्यांच्या स्पेशल लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ते त्यांच्या वयाच्या कितीतरी जास्तपट वयाचे दिसत आहेत. ही कमाल आहे मेकअपच्या आधुनिक तंत्राची. कुठल्याही चित्रपटामध्ये ‘मेकअप’ला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार हवी तशी व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर मांडण्याची किमया केवळ मेकअपमुळेच शक्य होत असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यात मेकअपमुळे कलावंताला ओळखणेही कठीण झाले. यंदा प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅन, सनम रे आणि कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातही असेच काहीसे बघायला मिळणार आहे.... ऋषी कपूर
येत्या १२ फेब्रुवारीला रिलिज होणाऱ्या ‘सनम रे’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटात ऋषी कपूर अशी भूमिका साकारत आहेत. ज्यात त्यांना ओळखणे अवघड होणार आहे. कपूर अॅण्ड सन्समध्ये त्यांनी अतिशय वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी केलेल्या मेकअपमुळे ते त्यांच्या खऱ्या वयापेक्षाही अधिक म्हातारे वाटतात. अमेरिकन आर्टिस्ट ग्रेग कॅनम यांनी ऋषी कपूर यांचा मेकअप केला असून, त्यासाठी त्यांना पाच तास आणि १.५ कोटी रुपये इतका खर्च आला. अमिताभ बच्चन
‘पा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या अमिताभ बच्चन यांचा लूक चांगलाच चर्चेत राहिला. ६० पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला १२ वर्षांच्या मुलाच्या भूमिकेत दाखविणे एका आव्हानच होते. मात्र मेकअपमुळे ते पडद्यावर दाखवता आले. हॉलिवूड मेकअप आर्टिस्ट क्रिस्टन टिस्ले यांनी हा मेकअप केला होता. एकदा तर सकाळच्या सहाच्या शूटिंगसाठी रात्री दोन वाजेपासूनच त्यांचा मेकअप सुरू करावा लागला होता. कमल हसन
मेकअपच्या बळावर चित्रपट हिट करण्यात कमल हसनचा हातखंडा आहे. ‘इंडियन’ चित्रपटातील ७० वर्षांचा म्हातारा असो वा ‘विश्वरूपम’मधील आतंकवाद्याची भूमिका असो यातील मेकअप कायम चर्चेचा विषय राहिला आहे. ‘चाची ४२०’ मधील चाचीचा रोल तर कोणीही विसरणार नाही. विद्या बालन
‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्या बालन बारा वेगवेगळ्या लूकमध्ये झळकली होती. यासाठी तिला शंभरपेक्षा अधिक व्यक्तिरेखांचा विचार करावा लागला होता. चित्रपट रिलीज होण्याअगोदर विद्या एका भिखाऱ्याच्या अवतारात समोर आली होती. विशेष म्हणजे, प्रमोशनच्यावेळी जेव्हा विद्याला या अवतारात लोकांमध्ये जाण्यास सांगितले, तेव्हा तिला कोणीही ओळखले नाही. ही खरी मेकअपची कमाल होती.हृतिक रोशन
‘धूम-२’मध्ये चोराची भूमिका साकारलेल्या हृतिक रोशन याचाही मेकअप चांगलाच गाजला. चोरी करतानाच्या प्रसंगात हृतिकने केलेला वयोवृद्धाचा मेकअप अचंबित करणारा होता. आश्चर्याची बाब म्हणजे म्हातारपणात हृतिक असाच दिसेल असा अंदाजही प्रेक्षकांनी लावला होता.