'या' कारणामुळे कुशल बद्रिकेने मानले मेकअप टीमचे आभार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 07:30 AM2019-07-18T07:30:00+5:302019-07-18T07:30:00+5:30

विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट ...

The 'make-up' team thanks to the 'strong' reason? Learn | 'या' कारणामुळे कुशल बद्रिकेने मानले मेकअप टीमचे आभार? जाणून घ्या

'या' कारणामुळे कुशल बद्रिकेने मानले मेकअप टीमचे आभार? जाणून घ्या

googlenewsNext

विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.. नुकतंच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.


या शोमधील विनोदवीर शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. नुकतेच कुशलने एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  भाऊ कदम, कुशल, सागर हे आपल्याला स्किटमध्ये कधी कधी स्त्रीवेशात दिसतात. स्त्री भूमिका निभावताना देखील ते प्रेक्षकांचं तितकंच किंबहुना जास्त मनोरंजन करतात आणि सर्वांना खळखळून हसायला भाग पडतात. पण त्या स्त्रीभूमिकेसाठी पडद्यामागे मात्र खूप तयारी करावी लागते. त्यांना स्त्रीवेशात सादर करण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे रंगभूषा. 


 कुशल बद्रिकेने मेकअप रूममधील सेल्फी शेअर करत  मेकअप टीमचे आभार मानले आणि त्यांचं कौतुक केलं आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तो असं म्हणाला आहे कि, "मी स्त्री दिसावं म्हणुन गेला तास भर हे झटतायत. 'चला हवा येऊ द्या' मेकअप टीम ऑल्वेज रॉक्स. हवा येऊ द्याच्या यशामध्ये सगळ्यात मोठ्ठा वाटा ह्यांचा आहे."

Web Title: The 'make-up' team thanks to the 'strong' reason? Learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.