चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

By रूपाली मुधोळकर | Published: October 23, 2020 04:36 PM2020-10-23T16:36:25+5:302020-10-23T16:38:29+5:30

सुमारे 8 महिन्यांपासून ‘लॉक’ असलेली चित्रपटगृहे  ‘अनलॉक’ झालीत. साहजिकच सिनेप्रेमी नवे सिनेमे पाहण्यास उत्सुक आहेत. पण...

makers of ranveer singh starrer 83 present these demands to multiplexes before its release |  चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

 चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. 

अनेक राज्यांतील कोरोना महामारीमुळे सुमारे 8 महिन्यांपासून ‘लॉक’ असलेली चित्रपटगृहे  ‘अनलॉक’ झालीत.  कदाचित पुढील महिन्यापर्यंत हळूहळू सर्व राज्यांतील चित्रपटगृहे सुरु होतील. साहजिकच सिनेप्रेमी नवे सिनेमे पाहण्यास उत्सुक आहेत. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ‘83’ या दोन सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘सूर्यवंशी’च्या रिलीजच्या मुहूर्ताबद्दल सध्या माहित नाही. पण ‘83’ रिलीज करण्याची तयारी मेकर्सनी सुरु केली आहे. मात्र हा सिनेमा रिलीज करण्याआधी मेकर्सनी थिएटर मालकांपुढे अटीशर्तींची भलीमोठी यादी ठेवली आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘83’च्या मेकर्सनी मल्टिप्लेक्स मालकांसमोर 4 मोठ्या अटी ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, या अटी पाहून मल्टिप्लेक्स मालकांचे डोळे पांढरे झाले आहेत. या अटी मानायला मल्टिप्लेक्स मालकांनी नकार दिला तर कदाचित ‘83’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करावा लागेल, अशीही चिन्हे आहेत.

‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.  रणवीर सिंग चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.  

काय आहेत अटी
पहिली अट
थिएटर मालकांनी व्हर्च्युअल प्रिंट फी घेऊ नये, ही ‘83’च्या मेकर्सची पहिली अट आहे. प्रत्येक स्क्रिनच्या हिशेबाने थिएटर मालक निर्मात्यांकडून सुमारे 20 हजार रूपये फी आकारतात. उत्तम प्रोजेक्शन सिस्टीम आणि साऊंड क्वालिटी देण्याच्या नावाखाली ही फी घेतली जाते. बहुतांश निर्मात्यांचा ही फी देण्यास विरोध आहे. थिएटर मालक केवळ भारतीय निर्मात्यांकडूनच ही फी घेतात. विदेशी चित्रपटांच्या निर्मात्यांकडून अशी कुठलीही फी घेतली जात नाही. त्यामुळे ती रद्द करावी, अशी अट ‘83’च्या निर्मात्यांनी ठेवली आहे.

दुसरी अट
अधिकाधिक स्क्रिन्सवर ‘83’ हाच सिनेमा दाखवावा, अशी या सिनेमाच्या मेकर्सची दुसरी अट आहे. ‘83’ हा एक महागडा सिनेमा आहे. त्यामुळे ही अट स्वाभाविक आहे, असे मेकर्सचे म्हणणे आहे.

तिसरी अट
सध्या नियमानुसार कोणताही सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाल्यानंतर 8 आठवडे ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकत नाही. ‘83’च्या मेकर्सनी मात्र 4 आठवड्यानंतर ओटीटी प्रदर्शनाची परवानगी मिळावी, अशी अट ठवेली आहे. ही अट थिएटर मालक कधीही मानणार नाहीत. कारण यामुळे सरळ सरळ त्यांच्या कमाईवर परिणाम होईल.

चौथी अट
रिलीज झाल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यांत प्रेक्षक न मिळाल्यास ‘83’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याची लेखी परवानगी द्यावी, अशी मेकर्सची चौथी अट आहे. 

Web Title: makers of ranveer singh starrer 83 present these demands to multiplexes before its release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.