मलालमधील शर्मिन सहगलचे एकेकाळी वजन होते 94 किलो, अशाप्रकारे कमी केले वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:05 PM2019-07-08T13:05:48+5:302019-07-08T13:09:14+5:30

शर्मिन सहगलचे एकेकाळी वजन खूपच जास्त होते. तिच्या वजनामुळे लोक तिच्यावर हसायचे.

Malaal actress Sharmin Segal opens up on being bullied and fat shamed | मलालमधील शर्मिन सहगलचे एकेकाळी वजन होते 94 किलो, अशाप्रकारे कमी केले वजन

मलालमधील शर्मिन सहगलचे एकेकाळी वजन होते 94 किलो, अशाप्रकारे कमी केले वजन

googlenewsNext
ठळक मुद्देमी 17 वर्षांची होईपर्यंत माझे वजन जवळजवळ 94 किलो झाले होते. मला काहीही करून माझे वजन कमी करायचे होते. त्यामुळे मी माझ्या डाएटवर बारीक लक्ष दिले आणि एक्सरसाईज करायला सुरुवात केली.

संजय लीला भन्साळीने आतापर्यंत हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी, पद्धमावत यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याची निर्मिती असलेला मलाल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात आपल्याला दोन नवे चेहरे पाहायला मिळाले असून या चित्रपटातील नायिका ही संजय लीला भन्साळीची भाची आहे. 

मलाल या चित्रपटाच्या नायिकेचे नाव शर्मिन सहगल असून तिचे एकेकाळी वजन खूपच जास्त होते. तिच्या वजनामुळे लोक तिच्यावर हसायचे असे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. शर्मिनने दैनिक भास्करच्या मुलाखतीत सांगितले होते की, मला खरे तर डॉक्टर बनायचे होते. पण मी कॉलेजमध्ये असताना काही नाटकांमध्ये काम केले होते. त्यामुळे अभिनयाविषयी आवडत निर्माण झाली. पण त्या काळात माझे वजन जवळजवळ 94 किलो होते. इतके जास्त माझे वजन असल्याने मला पाहून लोक हसायचे. माझे  वजन पाहाता मी अभिनयक्षेत्रात प्रवेश करू शकेन का हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. मी दहा वर्षांची झाल्यानंतर अचानक माझे वजन वाढायला लागले होते. 

मी 17 वर्षांची होईपर्यंत माझे वजन जवळजवळ 94 किलो झाले होते. मला काहीही करून माझे वजन कमी करायचे होते. त्यामुळे मी माझ्या डाएटवर बारीक लक्ष दिले आणि एक्सरसाईज करायला सुरुवात केली. मेरी कॉम या चित्रपटासाठी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. त्यावेळी प्रचंड काम असायचे. दिवसातील 15 तास तरी मला उभे राहायला लागायचे. केवळ लंच ब्रेकमध्ये मी पंधरा मिनिटं मी बसायचे. मी गेल्या सहा-सात वर्षांपासून वजन कमी करत आहे. सुरुवातीला मी केवळ डाएट करायचे. व्यायाम करायचे नाही. त्याचा परिणाम माझ्या गुडघ्यावर आणि पाठीवर झाला. माझी पाठ आणि गुडघे प्रचंड दुखायचे. पण नंतर मी जिम, डाएट यांचा ताळमेळ घालून वजन कमी केले. 

मलाल या चित्रपटात शर्मिनसोबत जावेद जाफरीचा मुलगा मीजान मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती संजयसोबतच भुषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. 

Web Title: Malaal actress Sharmin Segal opens up on being bullied and fat shamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.