मलायका अरोराच्या आधी अर्जुन कपूरचे होते तिच्या नणंदेसोबतही अफेअर, वाचा काय होते हे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:59 PM2019-06-26T14:59:11+5:302019-06-26T19:00:00+5:30
अर्जुन सध्या मलायका अरोरा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अर्जुनपेक्षा मलायका वयाने मोठी असून तिचा विवाह अभिनेता अरबाज खानसोबत झाला होता.
खूपच कमी वर्षांत अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अर्जुन कपूरचे चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर फार चालत नसतील पण तरूणाईत त्याची मोठी क्रेझ आहे. त्याचा अभिनय आणि हिरोईनसोबतची त्याची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकांना आवडते.
अर्जुन आज अभिनेता असला तरी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. कल हो ना हो या चित्रपटासाठी त्याने निखिल अडवाणीला असिस्ट करत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यानंतर त्याने सलाम ए इश्क, नो एंट्री, वाँटेड यांसारख्या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्याने इश्कजादे या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला होता.
अर्जुनच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. सध्या तो मलायका अरोरा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अर्जुनपेक्षा मलायका वयाने मोठी असून तिचा विवाह अभिनेता अरबाज खानसोबत झाला होता. अरबाजचा भाऊ सलमान खानला अर्जुन आपला मेन्टर मानतो. अर्जुनला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सलमाननेच प्रोत्साहन दिले होते. पण आता सलमान अर्जुनसोबत बोलत देखील नाही. एकेकाळी सलमानसोबतच अर्जुनचे सलमानच्या कुटुंबियांसोबतचे संबंध अतिशय चांगले होते. सलमानची बहीण अर्पिता खान आणि अर्जुन अनेक वर्षं नात्यात होते. एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते की, अर्पिता हे त्याचे पहिले प्रेम होते आणि तिच्यासोबतच्या नात्याबद्दल तो खूप सिरियस होता. पण काहीच वर्षांत त्यांनी ब्रेकअप केले.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे लग्न १९९८ मध्ये झाले होते. त्यांना एक मुलगा असून त्यांनी लग्नाच्या १९ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटासाठी अर्जुनच जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. पण अर्जुनने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण काही महिन्यांपूर्वी अर्जुनने तो आणि मलायका नात्यात असल्याचे एका मुलाखतीत कबूल केले होते.