पॉकेटमनी मिळवण्यासाठी कमी वयातच केले मलायका अरोराने असे काम, कुटुंबियांनाही बसला होता धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:00 PM2021-10-23T13:00:51+5:302021-10-23T13:05:11+5:30

लीड एक्ट्रेस म्हणून तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नसले तरी, तरीही मलायका अरोराची लोकप्रियता कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Malaika Arora did this job at an early age to earn pocket money, Know Why | पॉकेटमनी मिळवण्यासाठी कमी वयातच केले मलायका अरोराने असे काम, कुटुंबियांनाही बसला होता धक्का

पॉकेटमनी मिळवण्यासाठी कमी वयातच केले मलायका अरोराने असे काम, कुटुंबियांनाही बसला होता धक्का

googlenewsNext

बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या आयटम नंबरने रसिकांना वेड लावणारी छैच्या छैय्या गर्ल मलायका अरोरा 48 वर्षांची आहे. या वयातही ती कमालीची सुंदर दिसते. तिचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणेही अशक्यच होते.जसं जसं  मलायकाचे वय वाढत जातंय तितकी जास्त ती सुंदर दिसू लागली आहे. मलायकाचे असंख्य चाहते आहेत. कधीकाळी मलायका आघाडीची मॉडेल होती, तिने 90 च्या दशकात अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने व्हीजे आणि रॅम्प वॉकही केला आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही जास्त माहिती लोकांना नाही. चंदेरी दुनियेत तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्ट्रगल तर करावेच लागते. मलायकालाही स्ट्रगल काही चुकला नाही. कमी वयात तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. तिला खूप लवकर खूप पैसे कमवायचे होते. त्यासाठी मलायकाने प्रचंड स्ट्रगल केले. स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मलायका काही थांबली नाही.  

मलायकाला करिअरमध्ये काय करायचे आहे हे तिच्या कुटुंबिलाही माहिती नव्हते. जेव्हा तिने तिच्या करिअरविषयी सांगितले तेव्हा मात्र कुटुंबीयांनाही चांगला धक्का बसला होता. कारण जे क्षेत्र तिने निवडले होते. त्या क्षेत्रात एंट्री मिळवण्यासाठीच किती कष्ट करावे लागतात याची कुटुंबियांनाही चांगलीच कल्पनी होती. अलीकडेच मलायका अरोराने एका मुलाखतीत खुलासा केला होता की लहान असतानाच तिच्यासमोर अनेक आव्हानं होती. तिने सांगितले होते की, पॉकेट मनी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.मला अजिबात कल्पना नव्हती की हे शेवटी माझे करियर बनेल.

तिने तिच्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात 1998 च्या 'दिल से' चित्रपटातील 'छौय्या छैया ..' या आयटम डान्सने केली होती. या गाण्यात ती शाहरुख खानसोबत डान्स करताना दिसली. लीड एक्ट्रेस म्हणून तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नसले तरी, तरीही तिची लोकप्रियता कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.मलायका अरोरा काही वर्षांपूर्वी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आली होती, जिथे तिने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले होते. शोमध्ये खुलासा करताना मलायका म्हणाली होती की, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिच्या सावळ्या रंगामुळे तिची थट्टा केली गेली. मलायका अरोरा हिने इंडस्ट्रीमध्ये तिच्यासोबत भेदभाव केल्याचे सांगितले होते. सावळा रंग आणि  गोरा रंग यात भेदभाव करायचे. तिने असेही सांगितले होते की प्रेग्नंसीदरम्यानही तिने काम करणे थांबवले नव्हते आणि मुलगा झाल्यानंतर 40 दिवसांनी कामावर परतली होती.

Web Title: Malaika Arora did this job at an early age to earn pocket money, Know Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.