अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:17 PM2024-09-12T12:17:56+5:302024-09-12T12:22:11+5:30

Anil Mehta Death : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

Malaika Arora father Anil Mehta postmortem report has revealed the cause of his death | अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड!

अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड!

Anil Mehta Postmortem Report : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवुड इंडस्ट्री हादरली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अनिल यांनी आयशा मनोर बिल्डिंगच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले असले तरी कुटुंबीयांनी हा अपघात असल्याचे सांगितले. अनिल मेहता हे आपल्या आजारपणामुळे चिंतेत होते आणि त्यांनी आपल्या दोन्ही मुलींशी याबद्दल चर्चा केली होती. आता अनिल मेहता यांच्या शवविच्छेदन अहवालाचे काही तपशील समोर आले आहेत, त्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.

११ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली समोर आली. ही घटना घडली तेव्हा फक्त मलायकाची आई घरी होती तर अभिनेत्री पुण्यात होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच मलायका तातडीने मुंबईला रवाना झाली. बहीण अमृता अरोरा, करीना कपूर, सैफ अली खान आणि अर्जुन कपूरसह सलमान खानचे संपूर्ण कुटुंब लगेच मलायकाच्या घरी पोहोचले.

अनिल मेहता यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आल्यानंतर मुंबई पोलीस वांद्रे येथे पोहोचले होते. त्याच्या पाठोपाठ फॉरेन्सिक टीमही तिथे आली. अनिल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आता शवविच्छेदनाशी संबंधित तपशीलही समोर आले आहेत. यामध्ये त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण समोर आले आहे.

प्राथमिक तपासानंतर लिसांनी प्रथमदर्शनी अनिल मेहता यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले. अनिल मेहता जिथे पडले तिथे आजूबाजूला रक्ताचे डाग होते. मलायकाच्या आईने पोलिसांना सांगितले, अनिल मेहता बाल्कनीत वर्तमानपत्र वाचत होती. मात्र त्यानंतर त्यांची चप्पल फक्त तिथे होती आणि मी बाल्कनीतून डोकावले तेव्हा वॉचमन मदतीसाठी ओरडताना दिसला.

दुसरीकडे, अनिल मेहता यांना अनेक जखमांमुळे दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. सातव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. यापेक्षा अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. बुधवारी रात्री आठ वाजता अनिल मेहता यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपासासाठी त्यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृत्यूच्या आदल्या रात्री अनिल मेहता यांनी त्यांची मोठी मुलगी मलायका हिच्याशी फोनवर चर्चा केली होत. तर त्यांची धाकटी मुलगी अमृता हिच्यासोबत भेट घेतली होते. मृत्यूच्या आदल्या रात्री अमृता आणि मलायका त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी घरी पोहोचल्या होत्या. तेव्हा आपण आजारपणाला कंटाळल्याचे वडिलांनी दोन्ही मुलींना सांगितले. त्यानंतर अचानक दुसऱ्याच दिवशी अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं.

Web Title: Malaika Arora father Anil Mehta postmortem report has revealed the cause of his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.