म्हणे, माझा अर्जुन...! मलायका अरोराने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली; पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:41 AM2019-06-27T10:41:13+5:302019-06-27T10:42:28+5:30
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या चर्चित कपलपैकी एक आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आत्तापर्यंत दोघांनीही उघडपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. कदाचित दोघांनाही योग्य वेळेची प्रतीक्षा असावी. अखेर ही योग्य वेळ आलीच.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या चर्चित कपलपैकी एक आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आत्तापर्यंत दोघांनीही उघडपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. कदाचित दोघांनाही योग्य वेळेची प्रतीक्षा असावी. अखेर ही योग्य वेळ आलीच. होय, काल अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर मलायकाने असे काही केले की, दोघांच्याही नात्यावर शिक्कामोर्तब झाले.
मलायकाने अर्जुनला काही हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केवळ इतकेच नाही तर पहिल्यांदा त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. या फोटोत मलायका अर्जुनचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी आहे.
‘माझा क्रेझी, फनी आणि अमेझिंग अर्जुन कपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम,आनंदी राहा’असे रोमॅन्टिक कॅप्शन तिने या फोटोला दिले. वाढदिवसाला अर्जुनसाठी यापेक्षा बेस्ट गिफ्ट काय असू शकते?
मलायका व अर्जुन दोघेही एकत्र पार्टी करतात, एकत्र फिरताना दिसतात. पण अर्जुनसोबतचा फोटो अशाप्रकारे सार्वजनिकरित्या पोस्ट करण्याची मलायकाची ही पहिलीच वेळ आहे. या फोटोवरून मलायका व अर्जुनचे नाते आता बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. मलायकाने अर्जुनचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला. न्यूयॉर्कला रवाना होतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन व मलायकाच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अर्थात अलीकडे एका मुलाखतीत, मला लग्नाची कुठलीही घाई नाही, असे अर्जुनने स्पष्ट केले होते. मलायकासोबतच्या नात्यावरही तो बोलला होता. मी माझे नाते सामान्य ठेवू इच्छितो. कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही काहीही लपवलेले नाही, असे त्याने सांगितले होते.