मलायकाची पोस्ट चर्चेत, अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर म्हणते- "मी सिंगल किंवा रिलेशनशिपमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:13 PM2024-11-25T16:13:57+5:302024-11-25T16:14:34+5:30
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाने सांगितलं रिलेशनशिप स्टेटस, स्टोरी शेअर करत म्हणते...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अर्जुनने एका कार्यक्रमात चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देताना सिंगल असल्याचं सांगत मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. आता अर्जुन आणि मलायका वेगळे झाले आहेत.
मलायका ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या या आयटम गर्लने अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मलायकाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आतादेखील मलायकाची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर रिलेशनशिप अपडेट दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये आता माझं स्टेटस असं लिहिलं असून रिलेशनशिप, सिंगल आणि hehehe असे तीन पर्याय दिल्याचं दिसत आहे. मलायकाने रिलेशनशिमध्ये किंवा सिंगल यावर टिक न करता तिने hehe या ऑप्शनवर टिक केल्याचं दिसत आहे. मलायकाची ही इन्स्टास्टोरी व्हायरल झाली आहे.
मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजने गेल्याच वर्षी शूरा खानशी निकाह करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली.