अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेकाचा सांभाळ कसा केला? मलायका म्हणाली, "सुरुवातीला कठीण वाटलं, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:49 PM2024-06-28T15:49:56+5:302024-06-28T15:50:25+5:30

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अरबाजबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. घटस्फोटानंतर लेकाचा सांभाळ कसा केला, याबाबतही मलायकाने या मुलाखतीत सांगितलं.

malaika arora talk about co parenting son arhaan after divorce with arbaaz khan | अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेकाचा सांभाळ कसा केला? मलायका म्हणाली, "सुरुवातीला कठीण वाटलं, पण..."

अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेकाचा सांभाळ कसा केला? मलायका म्हणाली, "सुरुवातीला कठीण वाटलं, पण..."

मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये मलायका झळकली आहे. छैय्या छैय्या ते मुन्नी बदनाम हुई...अशा आयटाम साँगमुळे मलायका प्रसिद्धीझोतात आली. पण, बॉलिवूडमधील करिअरपेक्षा मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अरबाजबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. घटस्फोटानंतर लेकाचा सांभाळ कसा केला, याबाबतही मलायकाने या मुलाखतीत सांगितलं. 

मलायकाने नुकतीच हॅलो मॅगजीनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने घटस्फोटानंतर लेक अरहानचा सांभाळ कसा केला याबाबत भाष्य केलं. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाजने  मुलाचं संगोपन मात्र एकत्र केलं. मुलासाठी ते अनेकदा एकत्र आलेले दिसायचे. याबाबत मलायका म्हणाली, "सुरुवातीला हे थोडं कठीण गेलं. कारण, आयुष्य हे असंच आहे. आमच्यात जे काही आहे त्याचा मुलावर काहीच परिणाम झाला नाही पाहिजे, हे आम्ही ठरवलं होतं. आणि यासाठी को-पॅरेटिंग करण्यासाठी आम्ही योग्य मार्गही शोधून काढला". 

"मला अरहानसोबत मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायचं होतं. असं नातं ज्यामध्ये तो माझ्याशी काहीही शेअर करू शकतो. कुठल्याही गोष्टीबद्दल माझ्याशी बोलण्याआधी त्याला १० वेळा विचार करावा लागला असता, तर ते मला आवडलं नसतं. तो माझ्याशी काहीही शेअर करतो, ही गोष्ट मला आवडते. माझी भाची आणि पुतण्यांबरोबरही माझं असंच नातं आहे. त्यांचं बोलणं ऐकायला मला आवडतं. त्याबद्दल माझं मत त्यांना सांगायला आवडतं. त्याबरोबरच माझ्या मतांचा विचार न करता त्यांचे निर्णय त्यांनी स्वत: घ्यावेत असं मला वाटतं," असंही मलायकाने सांगितलं. 

अरबाज खान आणि मलायकाने १९९८ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. २००२ मध्ये मलायकाने अरहान या त्यांच्या लेकाला जन्म दिला. सुखी संसाराच्या १९ वर्षांनंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. काही महिन्यांपूर्वीच अरबाजने नूरा खानशी लग्न करत दुसऱ्यांदा संसार थाटला. तर मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. पण, सध्या त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. 

Web Title: malaika arora talk about co parenting son arhaan after divorce with arbaaz khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.