मलायका अरोराला बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून उंचावल्या सर्वांच्या भुवया, लोक म्हणाले - उर्फी की दीदी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:18 PM2023-03-25T17:18:23+5:302023-03-25T17:21:37+5:30

मलायका बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2023 मध्ये बॅकलेस स्लिट ड्रेस घालून पोहोचली. लोकांनी तिला 'उर्फीची दीदी'म्हणत ट्रोल केलं आहे.

Malaika arora trolls for her black revealing gown netizens compare her with uorfi javed | मलायका अरोराला बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून उंचावल्या सर्वांच्या भुवया, लोक म्हणाले - उर्फी की दीदी..!

मलायका अरोराला बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून उंचावल्या सर्वांच्या भुवया, लोक म्हणाले - उर्फी की दीदी..!

googlenewsNext

Malaika Arora Troll:बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. वयाच्या 47 व्या वर्षीही मलायका अरोरा बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्रींना खूप टक्कर देते. मलायका बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2023 मध्ये बॅकलेस स्लिट ड्रेस घालून पोहोचली. या ड्रेसमधील अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा होता, मात्र अनेक सोशल मीडिया यूजर्सनी तिच्यावर उर्फी जावेदची कॉपी केल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर काही सोशल मीडिया युजर्सनी मलायका अरोराला 'उर्फीची दीदी' म्हणून टॅगही केले. तिचे हे फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहेत.

मलायका अरोराचा हा ड्रेस बॅकलेस आणि बॅक स्लिट होता. त्याची ही स्टाईल बघता बघता चर्चेत आली. अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर तिची पाठ फ्लॉन्ट केली. मलायका अरोराने कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अभिनेत्री कधी साइड पोज देताना दिसली तर कधी फ्रंट पोझ. 

मलायका अरोराही तिच्या लूकमुळे लोकांच्या निशाण्यावर आली आहे. अनेक युजर्सनी तिच्यावर उर्फी जावेदची स्टाईल कॉपी केल्याचा आरोप केला आणि तिला उर्फीची बहीणही म्हटले.

मलायका अरोराची ही स्टाईल पाहून एका यूजरने लिहिले की, "असे दिसते की उर्फीच्या व्हायरसचा प्रभाव आहे." तर दुसर्‍या यूजरने लिहिले, "उर्फी जावेदची बहीण." एका यूजरने मलायका अरोराला उर्फी जावेदची कॉपी कॅट ही म्हटलं आहे. 

Web Title: Malaika arora trolls for her black revealing gown netizens compare her with uorfi javed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.