मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 12:59 PM2021-01-16T12:59:39+5:302021-01-16T13:03:21+5:30

कोरोनाचा धोका बघता, मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला होता. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.

Manasi Naik starts wedding festivities with Grahmukh puja | मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय

मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय

googlenewsNext

बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे.  लग्नापूर्वी केल्या जाणा-या  गृहमुख पूजेची फोटो समोर आली आहेत. बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे.  येत्या  १९ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे. मानसी तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

 

 

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर मानसीचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.

 

कोरोनाचा धोका बघता, मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला होता. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. यावेळी मानसीची अतिशय जवळची मैत्रिण व अभिनेत्री दीपाली सय्यद हजर होती. प्रदीपचे कुटुंबीय आणि नातेवाईकही या सोहळ्याला हजर नव्हते. ते हरियाणात राहत असल्यामुळे त्यांना या सोहळ्याला हजर राहता आले नाही. मात्र व्हिडीओ कॉलद्वारे ते सगळे या सोहळ्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रीय पद्धतीचा साखरपुडा आणि रोका असे दोन्ही सोहळे यावेळी पार पडले होते.


मानसीने याबद्दल सांगितले की, आम्ही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. मात्र आता हे रिलेशनशिप पुढे नेण्याची योग्य वेळ आली होती. आम्ही दोघांनी साखरपुडा करावा, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा होती. प्रदीपच्या वडिलांनीही साखरपुड्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. जानेवारी आमचा लग्न करण्याचा विचार आहे.

Web Title: Manasi Naik starts wedding festivities with Grahmukh puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.