‘एक अलबेला’मध्ये मंगेश देसाईचे स्टंट्स
By Admin | Published: June 20, 2016 01:40 AM2016-06-20T01:40:43+5:302016-06-20T01:40:43+5:30
‘एक अलबेला’ या चित्रपटात भगवानदादाची भूमिका साकारणारे मंगशे देसाई यांनी डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वत:मध्ये उतरवले आहेत.
‘एक अलबेला’ या चित्रपटात भगवानदादाची भूमिका साकारणारे मंगशे देसाई यांनी डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वत:मध्ये उतरवले आहेत. २२ फुटांवरून उडी मारायची असो, वा स्वॉर्ड फायटिंगचे कसब दाखवणे, कोणत्याही बॉडी डबलशिवाय मंगेश देसाई यांनी स्वत: हे सगळे स्टंट्स केले आहेत. स्वॉर्ड फायटिंगच्या सरावा दरम्यान डोळ्याला दुखापत होऊनही शूटिंग लांबणीवर न टाकता मंगेशने ती पूर्ण केले असल्याचे त्यांनी ‘लोकमत सीएनएक्स’ला अभिमानाने सांगितले, तसेच याच आठवणींना उजाळा देत मंगेश देसाई म्हणाले, ‘माझे आयुष्य ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मी पहिल्यांदाच अॅक्शन सीक्वन्सेस केले आहेत. हे आव्हान माझ्यासाठी फार कठीण होते. मी करू शकेन की नाही, अशी शंका मनात होती, पण प्रत्येक अभिनेत्याला आव्हान स्वीकारावेच लागते, तसेच हे आव्हानदेखील मी स्वीकारले.’